---|| राजे ||---

Monday, March 14, 2011

---|| ताई तुझ्यासाठी - ५ ||---

ताई ...........
मी जेंव्हा लहान होतो
खिडकीतून बघत होतो
त्या शाळेमध्ये
एक शिबीर भरले होते
अध्यात्माचे ......
डोळे मिटून
पद्मासनात बसून
ध्यानमुद्रा करून ते
ओंकार म्हणत होते
शेवटून गुरुजींनी
सद्भावना वितरण केले
म्हणजे.........
तुमच भल हो
तुम्ही सुखी हो
तुमच्या समस्या दूर हो
अशा भावना व्यक्त केल्या
त्यातली एक भावना
मी तुझ्यासाठी राखून ठेवली
वाटले...........
तू येशील तेंव्हा
ती भावना तुला देईन
पण तू नाही आलीस
पण गुरुजी म्हणाले होते 
कि सद्भावना दुरून पण देता येतात 
त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने 
डोळे मिटून 
पद्मासनात बसून 
तीन वेळा ओंकार म्हणून  
देवाला प्रार्थना केली
माझी ताई जिथे असेल
तिला सुखी ठेव
तिला छान छान खाऊ दे
तिचे सगळे हट्ट पूर्ण कर
तिला तिच्या भावाची
लवकर भेट करून दे
ताई, तू लवकर ये
ताई, तू लवकर ये
ताई, तू लवकर ये
               ---|| लेखक माहित नाहीत||---

Monday, March 7, 2011

---|| कस हे भाऊ बहिणीच नात ||---

 

अस हे भाऊ बहिणीच नात
क्षणात हसणार , क्षणात रडणार
क्षणात मारणार , क्षणात मार खाणार
क्षणात भांडणार , क्षणात रागवणार
पण किती गहर प्रेम आसत हे दोघाच
आस आसत हे बहिण भावाच आतूट नात !! १ !!

ताई पाणी भरते , भाऊ तीला मदत करतो
तेच पाणी तो खेळन्यासाठी वापरू लागला की ताई त्याला ओरडते
पण ओरडन्यामागे तीचे भावावरिल प्रेम लपलेल आसत
आस आसत हे बहिण भावाच आतूट नात !!२ !!

भाऊ मस्ती करतो , ताई त्याला फटका मारते
पण भाऊ लहान घरच्यांचा लाडका , तिला ओरडा पडतो
पण तोच आपल्या तीच सांत्वन करायला पुढे आसतो
आस आसत हे बहिण भावाच आतूट नात !! ३ !!

बहिण सासरहून येते , भावाला खुप आनंद होतो
तो तिच्याशी परत आपल्या बालपनात हारून जातो
पण ती परत सासरला चालली की
तो घरातील एका कोपर्यात रडत बसतो
आस आसत हे बहिण भावाच आतूट नात !! ४ !!
                                                         कवी: आनंद राजगोळे

---|| रक्ताच्या नात्याला तरी तोडू नकोस ||---

सकाळी उठलो तर वाटलं कुणी तरी भेटणार
आपल्या हृदयाचा ठाव कुणी तरी घेणार
योगायोगानेच आपली ओळख झाली
वाटलं मनाला कुणीतरी जवळची भेटली

मैत्रीच्या झाडात आपल्या लागले प्रेमाचे फळ
संकटांच्या क्षणीच नेमके दिले तू मला बळ
मैत्रीच्या नात्याला तू एक नविनच आयाम दिलं
एक अजुन बहिण भेटल्याने मन स्फंदून गेलं

पहिले रोज काही नविन घडत नव्हतं
आता मात्र सांगायलाही वेळ पुरत नव्हतं
काय सांगू काय नाही असं व्हायचं
तू समोर आलीस की सगळ विसरायला व्हायचं

आठवते का ग तुला पहिल्या राखिला तू मला राखी पाठवली नव्हतीस
सख्या भावांच्या गर्दित तू या मानलेल्या भावाला विसरली होतीस
विचारल तर म्हणालीस अरे घरी वेगळ वाटेल
तुझ्या माझ्या नात्याचं सत्य कस कोणी समजेल

तेव्हाच मी ठरवलं आपल्या मनाशी
एक वेळ अशी येईल जेव्हा तू मला धरशील उराशी
आठवेल तुला आपण क्षणोक्षणी किती भांडायचो
उगाचच खिलज्या पाडून पुन्हा मनवायचो

एके दिवशी नको तेच अघटित घडले
तुला तुझ्या रक्ताच्या नात्याचं कुणीतरी भेटले
अनवधानानी तू त्याच्याशी जवळीक करत गेलीस
रक्ताच्या भावापुढे मानलेल्या भावाला विसरून गेलीस

दिवसांमागुन आठवडे महीने निघून गेले
आपले मात्र बोलायाचे तसेच राहून गेले
एकदा भांडणाचा उद्रेक झाला
तुझ्या त्या रक्ताच्या भावाने आपला सम्पर्कच मिटवला

आजही तुझ्या आवाजाची वाट बघतोय
प्रेमाने "दाद्या" म्हणशील म्हणून रोजच मरतोय
एकदा ताई म्हणालो नाही याचा का एवढा बदला घेतलास
माझ्या वाटचा घास तू त्याच्या तोंडी भरवलास

कधीही विसरु नकोस आपल्या या भावाला
धाकटी बहिण असुनही तुला तिचाच दर्जा देणार्याला
कधी तरी माझी आठवण काढशील का ग
मानलेल्या या भावाला आठवशील ना ग

असशील तू दूर सध्या तरी माझ्या मनात राहशील
हाक तर मारून बाघ सदैव मला तुझ्यासाठी उभाच बघशील
मानलेल्या नात्यापेक्षाही श्रेष्ठ असतं का ग रक्ताचं नातं
फुल तरी विसरते का आपल्या झाडाचं पातं

आपल्या प्रेमाला कधी विसरु नको
एव्हढच मागतो की त्या रक्ताच्या नात्याला तरी तोडू नकोस...

                                                                     
                                                                                 कवि : अक्षय

संदर्भ : http://dedhakka.blogspot.com/2010/07/marathi-kavita_26.html

Friday, March 4, 2011

---|| ताई तुझ्यासाठी -4 ||---

ताई....
मी जेंव्हा लहान होतो
त्या शाळेसमोर
माझ्या मित्राचे घर आहे
खिडकीतून मित्र दिसत होता
घरातील कोणी मोठी व्यक्ती
त्याला मारत होते
तो खूप रडत होता
तेव्हड्यात त्याची ताई
स्वयपाक घरातून धावत आली
त्याला घट्ट मिठी मारून
त्यांच्यापासून वाचवून
दुसऱ्या खोलीत घेवून गेली
दार घट्ट लावून
त्याला खूप वेळ समजावत होती
त्याचे खूप लाड करत होती
पाहून मला खूप बर वाटल
सर्व शांत झाल्यावर
मी रात्री हळूच
त्याच्या खिडकीजवळ गेलो
हळू आवाजात त्याच्याशी बोलत
मी त्याच काय चुकल होत
नीट समजावून घेतलं
ती चूक मी राखून ठेवली
वाटले.....
तू येशील तेंव्हा
मी पण तीच चूक करीन
पण तू नाही आलीस 
                      ---|| लेखक माहित नाहीत||---

---|| ताई तुझ्यासाठी -3 ||---

ताई.......
मी जेंव्हा लहान होतो
खिडकीतून बघत होतो
त्या शाळेत एक लग्न होते
दरवाज्यात उभ्या
एक छान मावशी
पाहुण्यांच्या अंगावर
गुलाबजल शिंपडत होत्या
मी पण हळूच गेलो
मावशीनी गुलाबजल
 माझ्यावर शिंपडले
मला छान वाटले
त्यातला एक थेंब
कापसात शोषून
मी तुझ्यासाठी राखून ठेवला
वाटले.....
ईतर मुलींप्रमाणे
तुला पण गुलाबजल आवडत असेल तर ?
पण तू नाही आलीस
म्हणून तो थेंब सुकून गेला
सुगंध पण विरून गेला
पण, तू येशील तेंव्हा
तुला गुलाबजल आवडत असेल तर
मला माहित आहे
त्या मावशी कोठे राहतात 
                           ---|| लेखक माहित नाहीत||---