---|| राजे ||---

Saturday, March 23, 2013

---|| भावंडे ||---

माझ्या भावंडामुळे मला एकटेपणा कधीच जाणवला नाही, माझ्या लहानपणी प्रत्येकाच्या घरी २/३ मुले असायचीच. त्यामुळे कधी कोणाला एकटेपणा जाणवला असे ऐकिव ही नाही. लहानपणी बहिण-भावंडांच्या मा-यामा-या, एकच वस्तु दोघांना हवी असायची, मग मोठे कोण त्याला सर्वदा त्याग करायला लागायचा, आणी लहान असेल त्याची चैन असायची, पण कधी कधी तु अजुन लहान आहेस, असे सांगुन दादा/ताई भाव खाऊन जायचा/ जायची. कोणताही पदार्थ कितीही आवडत असला तरी आपल्या बहिण / भावांना दिल्याशिवाय आपल्या घशातुन घास उतरत नसे, आई-बाबा आपल्यामुळे आपल्या बहिण / भावाला ओरडले तरी आपल्याला ते आवडत नसे, कधी कधी आई-बाबाचा मार बहिण / भावाला पडत असल्यास आपले ही एका बाजुला मुक रडणे चालु असे. एकाला लागले तर त्याची कळ दुस-याला येणारच इतका ओलावा नात्यात असायचा. मोठ्या भावंडाच्या चांगल्या- वाईट सगळ्यांच गोष्टीची जशीच्या तशी कॊपी करणे चालु असायचे.
हे झाले लहानपणाचे, पण जसे वयात येऊ लागतो तसे ही आपले जवळचे मित्र-मैत्रीण म्हणुन आपली भावंडे सदैव आपल्या बरोबर असतात. भाऊ मोठा आणी बहिण धाकटी असेल तर भावाला आपल्यावर जास्त जबाबदारी आहे याची जाणिव होते. तर कधी बहिणी- बहिणीच्या अनंत गप्पा चालुच असतात, बहिणीची कळ काढण्यात भावाला मज्जा येत असते, बहिण कधी चिडली, कधी रडवेली झाली की मस्त पैकी कॆडबरी नाहीतर आईस्क्रीम घेऊन भाऊ रुसवा काढुन टाकतो, आणि परत तुझी कळ काढणार नाही, मला काय माहित तु एवढी रडवी असशील असे आणि बोलुन घेतो.
पण जेव्हा लग्न हो ऊन बहीण सासरी जाताना तर बहिणी आणि भावाच्या दोघांच्या ही डॊळ्यातील पाणी थांबतच नाही. कधी बहिण माहेर पणाला आली की तीच्यासाठी काय करू आणि काय नको असे भावाला होते, घरात फक्त बहिण म्हणेल तेच होणार असते, बहिण ही भावाच्या पसंती्चे पदार्थ करून, आवडती भेट देऊन आपले प्रेम त्यातुन व्यक्त करत असते. बहिणी- बहिणी असल्यातरी एकमेकींच्या साठी जोरदार खरेदी होते, एकमेकांची मने जपली जातात, रात्र रात्र भर मस्त पैकी गप्पांची मैफिल रंगल्यावर लहाणपणीच्या खोड्या, भांडणे, फजिती, अशा अनेक गोष्टी एकमेकांच्या उकरून काढल्या जातात.
अशी ही भावंडाच्या प्रेमाची शिदोरी लहाणपणा पासुन बरोबर घेऊन आपण फिरत असतो, हे जेव्हा कोणाला भावंडासाठी हट्ट करताना पाहतो तेव्हा आपल्याजवळची प्रेमाने भरलेली शिदोरी अजुन मोठी वाटु लागते.
मी लहान असताना रविवारी मोगली ही सिरिअल लागायची त्यावेळी मला ती सिरिअल खुप आवडायची. आमची परिक्षा चालु होती, आणी माझ्या पपांनी मला हे वाचुन ठेव मी नंतर येईन आणि तुझा अभ्यास घेईन असे सांगुन गेले होते, मी पुस्तक जवळ घेऊन, टीव्ही लावुन मोगली पहात बसले होते, भाऊ दोन /तीन वेळा तरी सांगुन गेला होता की अभ्यास कर, पपा येतील, पण मी काही ऐकत नव्हते, आई ही सांगुन दमली, आणि इतक्यात पपा आले, आणि त्यांनी काही न बोलता टीव्ही बंद केला, तसा मला खुप राग आला मी ते पुस्तक दुर फेकुन दिले आणि मी अभ्यास करणार नाही असे सांगितले, ते पुस्तक फेकल्यामुळे माझ्या पपांना खुप राग आला त्यांनी मला ५ आकडे मोजे पर्यत पुस्तक उचल असे सांगितले, तरी मी जागची हलायला तयार नव्हते, भाऊ जवळच उभा होता, तो पपांना सांगु लागला मी पुस्तक उचलतो तुम्ही तिला रागवु नका, पण त्याला पपांनी तु पुस्तक उचलायचे नाही तिनेच ते उचलले पाहिजे असे सांगितले, तरी मी गाल फुगवुन तशीच उभी होते, मग पपांनी हातात पट्टी घेतली तरी मी पुस्तक उचलायला तयार नव्हते, आणि पपा जसे जवळ आले तसा भाऊ माझ्या माझ्या पुढे येऊन उभा राहिला आणि तीला मारू नका असे पपांना सांगुन रडु लागला, आणि तो रडु लागला म्हणुन मी ही रडु लागले.

---|| ||---

संदर्भ: http://www.misalpav.com/node/5307

---|| माझी लाडकी ….||---

नाते तुझे माझे नव्हते नवे
नाते तुझे माझे हे नव्हते ही जुने
क्षणातच मला दा म्हणालीस …
व मला माझी लाडकी बहीण मिळाली…..
तुला न पाहता केली मी माझी..
खूप गोड आहे ग ही जादू प्रेमाची
मनात गवसतात हिच्या अनेक सूर
आहेस माझ्या काळजात का आहेस इतकी दूर

शब्दात आहे तुझ्या एक जादू
जी लावते वेड त्या प्रत्येक शब्दाचे…
कविता लिहीतेस तू जेव्हा……
गवसतात जणू तुझ्या अतंर्मनातील सूर

जेव्हा तू गालात हसतेस खूप गोड दिसतेस
न पाहिले कधी तूला मी..पण नकळतच मनात वसतेस
आज कळ्ले तुझ्यासारखी मैत्रीण कोणच नाही…अ.. माझी बहीण…
मनच काय माझे ह्र्दयही सांगते आहेस तू माझी लाडकी


संदर्भ : http://powerofmydreams.wordpress.com/2008/07/02/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A5%80/