---|| राजे ||---

Sunday, August 25, 2013

---|| नाते भावा बहिणीचे ||---





बहीण-भावास दरवर्षी प्रतीक्षा असते ती श्रावणमासात येणार्‍या राखी पौर्णिमेची. भावासाठी खास त्याची आवड लक्षात घेऊन बहिणी राखी निवडतात. बहिणीचे लग्न होऊन ती दूर रहात असेल किंवा भाऊ शिक्षण किंवा नोकरी निमित्ताने घरापासून दूर असेल तर राखी वेळेवर पोहचायला हवी यासाठी तिची धडपड सुरू असते. भावाचेही तसेच. आपल्या लाडक्या बहिणीसाठी यावर्षी काय भेट घ्यायची याच्या विचारात तो सतत असतो. त्यासाठी दुकाने पालथी घालातो.
सर्व आटापिटा झाल्यावर मग तो भाग्याचा दिवस उजाडतो. सकाळीच उठून झरझर सर्व कामे आटोपली जातात. बहिण सडा, रांगोळी घालते. आई गोड-धोड करते. संपूर्ण वातावरण प्रसन्नता व उत्साहाने भारलेले असते.
श्रावणातल्या निर्सगाच्या किमयेने नटलेल्या, सृष्टीचे चैतन्य ओसंडून वाहणार्‍या महिन्यात बहीण-भावांचा हा पवित्र सण येतो. या दोघांच्या नात्यातील गहिवर या दिवशी खऱ्या अर्थाने व्यक्त होतो. वास्तविक लहानाचे मोठे होईपर्यंत भांडण, खोड्या, खेळणं, बागडणं, शाळा, अभ्यास सर्व एकत्रच होत होते. हे सगळे शब्दातीत असते.
या दिवशी मात्र हे व्यक्त केले जाते. मात्र तेही आगळ्या पद्धतीने. सकाळी सकाळी चंदनाच्या साबणाने आंघोळ करून भावाला रांगोळी घातलेल्या पाटावर बसवले जाते. बहिण त्याला ओवाळते. आपल्या हाताने रेशमी सुताचा धागा असलेली राखी त्याला बांधते. या मांगल्याच्या क्षणी मनात उत्पन्न होणारे भाव फक्त बहिण- भाऊच जाणू शकतात. भाऊ आपण आणलेली भेट बहिणीस देतो.
बहिण-भावाचे नातेच तसे आहे विश्वास, आदर, त्यागाच्या पायावर उभे असलेले. बहिण ओवाळते त्यावेळी दोघांमध्येही मूक संवाद सुरू असतो. बहिण म्हणत असते, माझ्या भावा मी तुझ्यावर किती माया करते. बहीण भावास यश़, कीर्ती चिंतित असते. माझा भाऊ कर्तृत्ववान व सामर्थ्यवान व्हावा अशीच तिची मनोमन इच्छा असते. तर भाऊ म्हणत असतो, तू काळजी करू नको. अडचण व संकटसमयी धावून येणार तोच खरा भाऊ! तुझा भाऊसुद्धा अशा प्रसंगी नक्की धावून येईल.
बहीण- भाऊ दूर असले तर बहिण फोन करून राखी मिळाली का? म्हणून विचारायला कधीच विसरणार नाही. तोपर्यंत तिला चैन पडत नाही. भाऊही बहिणीच्या राखीची चातकाप्रमाणे वाट बघत असतो. राखी घेऊन येणार्‍या पोस्टमनला तो शतशः: धन्यवाद देत असतो. राखीचा लिफाफा हातात पडल्यावरचा आनंद जग जिंकल्यासारखाच असतो. आणि बहिणीने पाठविलेली राखी रक्षाबंधनाच्या दिवशी मनगटावर मिरवण्यातली ऐट काही औरच असते.
दूर असल्यामुळे प्रत्यक्ष भेट होत नसली तरी बहिणीची राखी व भावाने पाठवलेला राखी मिळाल्याचा संदेश यातूनच त्यांचा संवाद घडत असतो. प्रिय ताईकिंवा छोटी छकुलीतुझी राखी मिळाली.. खूप आनंद झालाएवढ्या ओळी त्यांच्यासाठी पुरेशा असतात.


---|| Vijay--- http://marathiasmita.info   ||---

Sunday, August 11, 2013

---|| बहिण माझी... ||---

मायेची छाया
प्रेमळ काया
सर्वांची लाडकी
बहिण माझी..........



निर्मळ मनाची
सुंदर स्वभावाची
आपुलकीने वागते
बहिण माझी.........



आई-बाबांची काळजी
भावंडांची चिंता
मनी धरून जगते
बहिण माझी.........



सर्वांची लाडकी
आनंदी सावली
माझ्या हृदयी राहिली
बहिण माझी................



       ------अमोल गोवेकर..........

Saturday, March 23, 2013

---|| भावंडे ||---

माझ्या भावंडामुळे मला एकटेपणा कधीच जाणवला नाही, माझ्या लहानपणी प्रत्येकाच्या घरी २/३ मुले असायचीच. त्यामुळे कधी कोणाला एकटेपणा जाणवला असे ऐकिव ही नाही. लहानपणी बहिण-भावंडांच्या मा-यामा-या, एकच वस्तु दोघांना हवी असायची, मग मोठे कोण त्याला सर्वदा त्याग करायला लागायचा, आणी लहान असेल त्याची चैन असायची, पण कधी कधी तु अजुन लहान आहेस, असे सांगुन दादा/ताई भाव खाऊन जायचा/ जायची. कोणताही पदार्थ कितीही आवडत असला तरी आपल्या बहिण / भावांना दिल्याशिवाय आपल्या घशातुन घास उतरत नसे, आई-बाबा आपल्यामुळे आपल्या बहिण / भावाला ओरडले तरी आपल्याला ते आवडत नसे, कधी कधी आई-बाबाचा मार बहिण / भावाला पडत असल्यास आपले ही एका बाजुला मुक रडणे चालु असे. एकाला लागले तर त्याची कळ दुस-याला येणारच इतका ओलावा नात्यात असायचा. मोठ्या भावंडाच्या चांगल्या- वाईट सगळ्यांच गोष्टीची जशीच्या तशी कॊपी करणे चालु असायचे.
हे झाले लहानपणाचे, पण जसे वयात येऊ लागतो तसे ही आपले जवळचे मित्र-मैत्रीण म्हणुन आपली भावंडे सदैव आपल्या बरोबर असतात. भाऊ मोठा आणी बहिण धाकटी असेल तर भावाला आपल्यावर जास्त जबाबदारी आहे याची जाणिव होते. तर कधी बहिणी- बहिणीच्या अनंत गप्पा चालुच असतात, बहिणीची कळ काढण्यात भावाला मज्जा येत असते, बहिण कधी चिडली, कधी रडवेली झाली की मस्त पैकी कॆडबरी नाहीतर आईस्क्रीम घेऊन भाऊ रुसवा काढुन टाकतो, आणि परत तुझी कळ काढणार नाही, मला काय माहित तु एवढी रडवी असशील असे आणि बोलुन घेतो.
पण जेव्हा लग्न हो ऊन बहीण सासरी जाताना तर बहिणी आणि भावाच्या दोघांच्या ही डॊळ्यातील पाणी थांबतच नाही. कधी बहिण माहेर पणाला आली की तीच्यासाठी काय करू आणि काय नको असे भावाला होते, घरात फक्त बहिण म्हणेल तेच होणार असते, बहिण ही भावाच्या पसंती्चे पदार्थ करून, आवडती भेट देऊन आपले प्रेम त्यातुन व्यक्त करत असते. बहिणी- बहिणी असल्यातरी एकमेकींच्या साठी जोरदार खरेदी होते, एकमेकांची मने जपली जातात, रात्र रात्र भर मस्त पैकी गप्पांची मैफिल रंगल्यावर लहाणपणीच्या खोड्या, भांडणे, फजिती, अशा अनेक गोष्टी एकमेकांच्या उकरून काढल्या जातात.
अशी ही भावंडाच्या प्रेमाची शिदोरी लहाणपणा पासुन बरोबर घेऊन आपण फिरत असतो, हे जेव्हा कोणाला भावंडासाठी हट्ट करताना पाहतो तेव्हा आपल्याजवळची प्रेमाने भरलेली शिदोरी अजुन मोठी वाटु लागते.
मी लहान असताना रविवारी मोगली ही सिरिअल लागायची त्यावेळी मला ती सिरिअल खुप आवडायची. आमची परिक्षा चालु होती, आणी माझ्या पपांनी मला हे वाचुन ठेव मी नंतर येईन आणि तुझा अभ्यास घेईन असे सांगुन गेले होते, मी पुस्तक जवळ घेऊन, टीव्ही लावुन मोगली पहात बसले होते, भाऊ दोन /तीन वेळा तरी सांगुन गेला होता की अभ्यास कर, पपा येतील, पण मी काही ऐकत नव्हते, आई ही सांगुन दमली, आणि इतक्यात पपा आले, आणि त्यांनी काही न बोलता टीव्ही बंद केला, तसा मला खुप राग आला मी ते पुस्तक दुर फेकुन दिले आणि मी अभ्यास करणार नाही असे सांगितले, ते पुस्तक फेकल्यामुळे माझ्या पपांना खुप राग आला त्यांनी मला ५ आकडे मोजे पर्यत पुस्तक उचल असे सांगितले, तरी मी जागची हलायला तयार नव्हते, भाऊ जवळच उभा होता, तो पपांना सांगु लागला मी पुस्तक उचलतो तुम्ही तिला रागवु नका, पण त्याला पपांनी तु पुस्तक उचलायचे नाही तिनेच ते उचलले पाहिजे असे सांगितले, तरी मी गाल फुगवुन तशीच उभी होते, मग पपांनी हातात पट्टी घेतली तरी मी पुस्तक उचलायला तयार नव्हते, आणि पपा जसे जवळ आले तसा भाऊ माझ्या माझ्या पुढे येऊन उभा राहिला आणि तीला मारू नका असे पपांना सांगुन रडु लागला, आणि तो रडु लागला म्हणुन मी ही रडु लागले.

---|| ||---

संदर्भ: http://www.misalpav.com/node/5307

---|| माझी लाडकी ….||---

नाते तुझे माझे नव्हते नवे
नाते तुझे माझे हे नव्हते ही जुने
क्षणातच मला दा म्हणालीस …
व मला माझी लाडकी बहीण मिळाली…..
तुला न पाहता केली मी माझी..
खूप गोड आहे ग ही जादू प्रेमाची
मनात गवसतात हिच्या अनेक सूर
आहेस माझ्या काळजात का आहेस इतकी दूर

शब्दात आहे तुझ्या एक जादू
जी लावते वेड त्या प्रत्येक शब्दाचे…
कविता लिहीतेस तू जेव्हा……
गवसतात जणू तुझ्या अतंर्मनातील सूर

जेव्हा तू गालात हसतेस खूप गोड दिसतेस
न पाहिले कधी तूला मी..पण नकळतच मनात वसतेस
आज कळ्ले तुझ्यासारखी मैत्रीण कोणच नाही…अ.. माझी बहीण…
मनच काय माझे ह्र्दयही सांगते आहेस तू माझी लाडकी


संदर्भ : http://powerofmydreams.wordpress.com/2008/07/02/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A5%80/

Monday, February 18, 2013

---|| प्रिय बहिणीसाठी.......||---

वेळ नसतो मला पण अशीही एक वेळ येते,
असतो जेव्हा रिकामा तेव्हा तुजी आठवण येते.

वाटत अस तेव्हा २० वर्ष निव्वल फुकट गेली,
आपण कधी धड बोललोच नाही हीच मोठी चुक  केली .

बघना "दी" तुझ्यामुळॆ मला एक  close frnd मिळाली ,
थोड़ी फार का होईना मुलींची "Way of thinking" कळाली .
.
तूच बाई एवढी माझी बक-बक एकून घेते ,
घोड्या,idiot,
नालायक अशा प्रेमाने शिव्या देते ..
.
Lucky वाटत तेव्हा मला अशी Sweet बहिण मिळाली,
पण दुःख:ही वाटत याच की ही वेळ खुप उशिरा आली..
.
वाटत तेव्हा अस की परत भुतकाळात जाव,
खुप खुप मस्ती करावी तुझ्याशी ,
खुप खुप बोलाव..
.
तेव्हा दूर होती,
आत्ता दूर  आहे,
नंतरही दुरच जाशील,
but always connected रहा ,
वेळातवेळ काढून कधीतरी  contact करत जा .

तू एकमेव व्यक्ति  आहे घरात जीला  माझे  each & every कीड़े  known असतील.
तुला खूप काही सांगितलय  ,
ज्याच्याशी माझे close friends पण unkonw असतील.
.
हजारो friends मिळतील आपल्याला ,
i dont think तुझ्या एवढी कोणी close मला मिळेल ,
झाली जरी close तरी तुझा जागी कधीच नसेल ..



संदर्भ : http://marathikavita.co.in/index.php?topic=3283.0

---|| काय देऊ ग बहिणी बया ||---

बहिणीच्या घरी भाऊ गेला लई दिसा
हाती बेल तांब्या बहीण पुजिती तुळसा
बहिणीच्या घरी भाऊ गेला लई दिसा
सोनियाचा गोफ कमरी करदोडयाचा फासा
बहिणीला भाऊ मोठा दुर्लभ वाटीयला
समया कारण भाऊ आला भेटायला
बहीण भावंड आहेत समस्तला
बहिणीची माया लई माझ्या ग बंधूला
बहिणीच्या घरी भाऊ करतो देऊ देऊ
बहिणीच्या आशीर्वादान माडी कळसाला जाऊ
नको भावा म्हणू बहिणींनी नासल
बहिणीच्या आशिर्वादे धनधान्य ते सायल
बहिणीच्या आशिर्वादे भाऊ झालेत कुबेर
चिरेबंदी वाडे बांधले चहुखोर ||

आंदण देई रे भाऊराया
काय देऊ ग बहिणी बया
वासरासहित पाची गाया
आंदण देई रे भाऊराया
काय देऊ ग बहिणी बया
ऊसा सहित पानमळा
आंदण देई रे भाऊराया
काय देऊ ग बहिणी बया
बहिण परिस लेकीची माया
आंदण देई रे भाऊराया 


संदर्भ : http://www.kavitakosh.org/kk/%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80#.USJBj_Kt-H8