"ताई तू फूल गडे माझे, ताई तू नक्षत्रचि माझे, ताई तू रत्न गडे माझे ताई तू पाखरू गे माझे ! या सर्वाहून गोड गोड गे शील रूप तुझे यांची उपमा नच साजे ! फूल हे हसते, तु हसशी परी तव अर्थ किती हास्यी ! काय फुलाच्या मला पाकळ्या दावितील मौजे जसे हे ओठ गडे तुझे?"
No comments:
Post a Comment