---|| राजे ||---

Saturday, January 28, 2017

---||भाऊ बहिण आणि शिवाजी राजे||---

भाऊ बहिण आणि शिवाजी राजे…

आपल्या बरोबरीची
आपल्याच वयाची
आपल्या आईच परमेश्वराने निर्माण केलेल दुसर रुप
म्हणजे बहिण…

रक्ताने नसले तरी प्रेमाने जोडता येणारे  परमपविञ नाते म्हणजे भाऊ बहिण…

भाऊ म्हणजे शक्ती
बहिण म्हणजे भक्ती

भाऊ म्हणजे कर्तव्य
बहिण म्हणजे वात्सल्य

असे हे नाते…
यासाठी एकाच आईपोटी जन्माला यायची गरज नाही.
किंवा ते रक्ताच असाव असही नाही.

रक्ताची नाती कदाचित स्वार्थासाठी तुटतील पण मनाची नाती कायम टिकतात.

ही नाती कशी जोडावी आणि टिकवावी हे शिवचरिञातून शिकता येते.

कल्याणच्या सुभेदाराची देखणी सुन समोर उभी आहे. शिवाजी राजा आहे. राजा काहीही करू शकतो. पण माझ्या राजाचे संस्कार बघा.
अशीच आमची माता आहे सुंदर रूपवती !
पाहून ती लावण्यवती वदले छञपती !!

पर स्त्री ला आई बहिणी सारखे मानून तीची पाठराखण करणारा शिवाजी हा जगातला एकमेव राजा होता.

अशीच एखादी स्त्री मोगल किंवा यवनांच्या ताब्यात सापडली असती तर …..
तर काय झाले असते….
भर दिवसा …
मुलं पतीच्या समोर स्ञिया पळवणारे नराधम कुठे ….
आणि कुठे माझा शिवाजी राजा….

त्या सुनेचा सन्मान करून, मानाने जेव्हा ती तिच्या घरी गेली तेव्हा ती काय बोलली असेल…

तुला त्या काफीराने पळवली..
तुझ्यावर अत्याचार तर झाले नाहीत ना…

या प्रश्नाला तीने उत्तर दिले असेल…

कौन कहता है मुझे भगाया. चुराया. मेरा अपहरण हुवा ! 
नही !.. मै तो मेरे मायके… अपने भाईके पास गयी थी ! मुझे तो फक्र होता है की ये हादसा हुवा इसिलिए मुझे शिवाजी जैसा भाई मिला.!

शिवाजीचे वर्णू गुण किती
न्याय आणि नीती
कल्याण खजिन्याच्या लुटीत एक मान
तरूणी लाभली रूपाची खाण
तिज पुढे नमवूनी मान
परस्ञिचा या केला बहुमान
असा शिवराय चारित्र्यवान……
          ….. शाहीर पिराजीराव सरनाईक

अरे जो माणुस शञूच्या स्ञीशी बहिणीच नात जोडतो तो आपल्या स्ञीयांशी कसे वागत असेल ……

आम्ही त्या शिवाजी राजाच नाव घेतो. आम्ही कस वागल पाहिजे…

हा शिवाजीचा महाराष्ट्र आहे.
तरी का होतात इथ स्ञीवर अत्याचार …

घरात फोटो लावून
घोषणा देऊन
कपाळाला गंध लावून कुणी शिवभक्त होत नाही.

परक्याच्या माता बहिणीला आपली माता बहिण माननारा तो शिवभक्त…..
प्रत्येक स्ञीचा सन्मान करणारा तो शिवभक्त….
घरातील स्ञीला समानतेची वागणूक देणारा तो शिवभक्त…
स्ञीवर अत्याचार करणारे हात कलम करणारा तो शिवभक्त…
आपल्या बहिणी प्रमाणेच दुसरी मुलगी ही कुणाची तरी बहिण आहे ही भावना ठेवणारा तो शिवभक्त…
तीचा पदर पाडणारा नाही तर पदर सावरणारा तो शिवभक्त…

शिवभक्त म्हणून मिरवणारे लाखो आहेत पण चारित्र्यसंपन्न विचारांनी जगणारा तो शिवभक्त…

ती रस्त्याने चालली….
खाली मान घालून …
चार टवाळ पोर…
तीच्यावर कमेंट सुरू…
तिच्या मागे फिरायला लागले …
ञास द्यायला लागले …
तेवढयात एक जन आला…
एकाला कानठाळला…
बाकीचे टवाळ पळून गेले …
ती मुलगी भारावली…
त्याच्या जवळ आली…
भाऊ… इथ किती लोक आहेत..पण या टवाळांना धडा शिकवायला तुम्ही पुढे आलात …

हो ताई.. कारण मि शिवभक्त आहे.
प्रत्येक स्ञी आमच्या देवघरातील देवता आहे. आणि आमच्या देवतेचा अपमान आम्ही करत नाही. आणि सहनही करत नाही. हीच शिकवण आहे आम्हाला शिवाजी राजाची…….
….

शिवराय दक्षिण दिग्विजय करून परतत होते. येताना बेलवडी हे गाव लागते. हे आता कर्नाटकात आहे. या गावात एक देसाईगढी आहे. ही मावळ्यांना जिंकायची होती. मोर्चे लागले …. लढाई सुरू झाली… एक  छोटीशी घडी… मावळे लढतायेत…पण गढी काही मिळेना… एक दिवस गेला …आठ दिवस गेले … पंधरा दिवस….तब्बल एक महिना लागला हि गढी जिंकायला… आणि जिंकली…. कोण होते त्या गढीत… कोण लढल एवढे चिवटपणे….. ती होती साविञी देसाई ….
ही लढवत होती ती गढी….
गढी ताब्यात आली… सावित्री कैद झाली …. राजे गढीत गेले .. गादीवर स्थानापन्न झाले… आणि सावित्रीला समोर आणले गेले … ती घाबरलेली.. गांगरलेली…आता माझ कस होणार …. तिला एक लहान मुल होत . त्याची काळजी लागली. मला शिवाजी मारणार . माझ बाळ अनाथ होणार . आता मी काय करू. राज्यांच्या समोर रडायला लागली …
महाराज मला मारा …
ठार मारा… पण माझ लहान बाळ आहे. माझ्या बाळाला मारू नका. हव तर माझा जीव घ्या .
हे तीचे शब्द ऐकून शिवाजी राजा गहिवरला… तीच्या बाळाला आणायची आज्ञा दिली … बाळ आणले … राजांनी ते छोटे बाळ हातात घेतले. सावित्रीच काळीज धडधडत होते .. आता शिवाजी माझ्या मुलाला मारणार .. काय करावे.
तेवढयात राजांनी आज्ञा दिली. सावित्री ला बंधमुक्त केले. ती धावत राज्यांच्या पायावर झुकली. माझ्या लेकराला मारू नका……..

आणि या शञूच्या बाईसाठी..
शिवाजी राजाच्या मुखातून शब्द बाहेर पडले.
ताई………….
ताई  … कोण म्हटले मी तुम्हाला मारणार … या बाळाला मारणार … मी तुम्हाला ताई म्हटले म्हणजे हे बाळ माझा भाचा झाला. 
आज पहिल्यांदा मी माझ्या भाच्याला भेटतोय… काही तरी दिले पाहिजे ना…
ताई या बाळाच्या दुधभातासाठी मी ही जिंकलेली गढी त्याला देतोय… आणि आजूबाजूचा प्रदेश तुला चोळी बांगडी साठी..
अस म्हणून राजांनी ते बाळ आईच्या हातात दिले. सन्मानाने तीला गादीवर बसवले . तीचा सन्मान केला. काय होतय हे तीला कळत नव्हते .. पण मगाशी दुःखाने येणारे आश्रू आता आनंदाने वहायला लागले.
राजा.. मी तुला शञू समजले..
मी वैरी समजले..
पण तुच भावा बहिणीच नात निर्माण करून या अबलेचा सन्मान केला…
धन्य शिवाजी राजा..
धन्य त्याचे माता पिता..

ही कथा इथच संपत नाही
शिवाजी निघुन गेले. पण शिवरायांचे शिल्प त्या बहिणीने उभारले.
यात गादीवर शिवाजी बसले आहेत..लहान मुल मांडीवर आहे. राज्यांच्या एका हातात दुधाची वाटी आहे आणि दुसऱ्या हातात चमचा आहे. या चमच्याने आपले छञपती बाळाला दुध पाजत आहेत आणि त्या बाळाची आई हे दृश्य मोठ्या कौतुकाने बघत आहे. अस शिल्प चित्र आजही त्या कर्नाटकातील बेलवडी गावात पहायला मिळते.

हेच शिल्प भावा बहिणीच्या प्रेमाची साक्ष देत आहे…

किती महान माझा शिवाजी राजा होता हो..

शिवरायांना सख्खी बहिण नव्हती
पण स्वराज्यातील प्रत्येक परस्ञी शिवाजी राजाला आपला भाऊ मानत होती .
आणि तुम्हाला सांगायची गरज नाही .
एकवेळ स्ञीया मुलाच ऐकत नाहीत …
नवर्याच ऐकत नाहीत ….
पण भावाच मात्र ऐकतात…

हा लेख  लिहिण्याचे कारणही हेच आहे की मला बहिण नाही . पण ही उणिव मला कधी भासली नाही . ज्यांना मी कधी पाहिलं नाही. भेटलो नाही पण अशा माझ्या बहिणी माझ्यावर जीवापाड प्रेम करतात. त्यांना मी त्याच्या भावाप्रमाणे आहे. अशा माझ्या बहिणीसाठी ही शब्दांची भावबीज..

खरच काय नात आहे भावा बहिणीच..
भाऊ ऊनाडक्या करत. खोड्या करत फिरणार. आणि घरी तक्रार आली की बहिण भावाच्या बाजूने उभी राहणार..
दादा जेवल्याशिवाय नाही जेवनार…
भावाचा गृहपाठ ही पुर्ण करणार ..
दादा दादा म्हणून मागेपुढे फिरणार..
दादाची थट्टा करणार ….
पण दुसरे कोणी दादाला बोलल की माञ हिला सहन नाही होणार …
रोज धिंगाणा घालणार ..
काही अडचण आली की दादा मागे दडणार..
लहानपणी भांडण झाले की दादाला बुक्या मारणार …..
आणि बहिणीचा कोमल हात लागत नाही म्हणून दादाही आनंदाने मार खाणार…
बहिणीच्या लग्नासाठी धावपळ करणार …
कर्ज काढणार..
दुप्पट काम करणार ..
माझी ताई सुखात तर मी सुखात या भावनेने जगणार..

आणि ज्या दिवशी हि लाडकी सासरला निघणार तेव्हा माञ याच्या अश्रूचा बांध फुटणार…
दगडाच्या काळजाचा भाऊ लहान मुलासारखा रडणार..
लग्नानंतरही तीच्या ख्याली खुशालीसाठी फोन करणार

काय नात आहे हे भाऊ बहिणीचे…
आणि काय नात आहे शिवाजी राजाच.
माझा शिवाजी भाऊ बहिणीच प्रेम शिकवून गेला .

किती बर होईल हे शिवाजी आपल्याला कळले तर…
वादाच्या पलिकडले शिवाजी …
बहिणीचा भाऊ शिवाजी …

माझ्या भावांनो प्रत्येक शिवभक्ताला हे शिवाजी कळले तर …
कोणत्याही स्ञीवर अत्याचार होणार नाही .
निर्भया सारखी प्रकरणे होणार नाहीत .
कारण प्रत्येक मुलीच्या रक्षणासाठी तीचा शिवभक्त भाऊ उभा असेल .

मध्यरात्री कामावरून सुटणारी तरूणी बिनधास्त असेल
कारण तिला विश्वास असेल
हा शिवबाचा महाराष्ट्र आहे.
शिवभक्तांचा महाराष्ट्र आहे.
माझ्या भावांचा महाराष्ट्र आहे.

7 comments: