---|| राजे ||---

Thursday, March 1, 2018

|| अशी ती माझी ताई..... ||

अशी ती माझी ताई.....
असे म्हणतात की आईच्या प्रेमाला कुणाचीही सर नाही,
पण माझ्यासाठी, जिचे प्रेम त्याही प्रेमातली उणीव भरू पाही... अशी ती माझी ताई.

असे म्हणतात की आईच्या प्रेमापलीकडे जगात काही नाही,
पण माझ्यासाठी, जिचे प्रेम त्याही सीमेपलीकडे पोहचू पाही... अशी ती माझी ताई.

कारण, जेव्हा आई म्हणायची "तू ऐकत नाही, माझ्याजवळ यायचे नाही."
तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी साठून जिच्या कुशीत डोके जाई... अशी ती माझी ताई.

कितीही जरी भांडलो, जरी कितीही वेळ आमच्यात रुसवा राही,
शेवटी जी स्वतः जवळ येऊन माझा प्रेमाने मुका घेऊन जाई... अशी ती माझी ताई.

खरंच, जरी या जगात आईच्या मायेला कुणाचीही सर नाही...
पण त्या प्रेमाएवढेच महत्वाचे निःशंक जिचे प्रेम राही... अशी ती माझी ताई.

आज रक्षा बंधनाच्या दिवशी कुणाचे मनगट जर सुने राही...
माझ्या मनगटाकडे पाहून माझ्याही डोळ्यात पाणी भरून येई...
पण जिच्या पाठवलेल्या राखीने ते आसवे पुसले जाई... अशी ती माझी ताई.

           -वैभव-
 

No comments:

Post a Comment