---|| राजे ||---

Monday, June 3, 2019

---|| फुला परी ठेवीन मी ताईला ||---

यु - ट्यूब वरती अल्ट्रा मराठी वरील ताई साठी असलेले  सुंदर गीत

https://www.youtube.com/watch?v=b50XlWt7Bjw



---|| वाढदिवशी दिलेल्या सुंदर शुभेच्छा ||---

आमच्या मित्राने बहिणीला वाढदिवशी दिलेल्या सुंदर शुभेच्छा

Thursday, March 1, 2018

|| अशी ती माझी ताई..... ||

अशी ती माझी ताई.....
असे म्हणतात की आईच्या प्रेमाला कुणाचीही सर नाही,
पण माझ्यासाठी, जिचे प्रेम त्याही प्रेमातली उणीव भरू पाही... अशी ती माझी ताई.

असे म्हणतात की आईच्या प्रेमापलीकडे जगात काही नाही,
पण माझ्यासाठी, जिचे प्रेम त्याही सीमेपलीकडे पोहचू पाही... अशी ती माझी ताई.

कारण, जेव्हा आई म्हणायची "तू ऐकत नाही, माझ्याजवळ यायचे नाही."
तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी साठून जिच्या कुशीत डोके जाई... अशी ती माझी ताई.

कितीही जरी भांडलो, जरी कितीही वेळ आमच्यात रुसवा राही,
शेवटी जी स्वतः जवळ येऊन माझा प्रेमाने मुका घेऊन जाई... अशी ती माझी ताई.

खरंच, जरी या जगात आईच्या मायेला कुणाचीही सर नाही...
पण त्या प्रेमाएवढेच महत्वाचे निःशंक जिचे प्रेम राही... अशी ती माझी ताई.

आज रक्षा बंधनाच्या दिवशी कुणाचे मनगट जर सुने राही...
माझ्या मनगटाकडे पाहून माझ्याही डोळ्यात पाणी भरून येई...
पण जिच्या पाठवलेल्या राखीने ते आसवे पुसले जाई... अशी ती माझी ताई.

           -वैभव-
 

।।बहिणच रूप ||

।।बहिण ।।
।। मायेचं साजुक तुप
आईचं दुसरं रूप।।

।। काळजी रूपी धाक
प्रेमळ तिची हाक।।

।। कधी बचावाची ढाल
कधी मायेची उबदार शाल।।

।। ममतेचं रान ओलांचिंब
पाण्यातील आपलंच प्रतिबिंब।।

।। दुःखाच्या डोहावरील
आधाराचा सेतू।।

।। निरपेक्ष प्रेमामागे
ना कुठला हेतू।।

।।कधी मन धरणारी ,
तर कधी कान धरणारी.।।

।।कधी हक्काने रागवणारी,
तर कधी लाडाने जवळ घेणारी.।।

।।बहिणीचा रुसवा जणु,
खेळ उन-सावलीचा.।।

।।भरलेले डोळे पुसाया
आधार माय- माऊलीचा.।।

।।कुठल्याच नात्यात नसेल एवढी
या नात्यात ओढ आहे.।।

।।म्हणूनच बहिणीचं हे नातं
चिरंतन गोड आहे.।।

।।भरलेलं आभाळ रितं कराया
तिचीच ओंजळ पुढे येई .।।

।।जागा जननीची भरुन
काढण्या निर्मीली आईनंतर ताई.।।

।।निर्मिली देवाने आई नंतर बहिण.।।
।। ज्यांना नाही बहिण, त्यांनी मानावी एक चांगली बहिन ........... ।।
👆Dedicated to all sisters👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

संदर्भ : https://www.facebook.com/maze.paan/posts/1562433467398061:0

Saturday, January 28, 2017

---||भाऊ बहिण आणि शिवाजी राजे||---

भाऊ बहिण आणि शिवाजी राजे…

आपल्या बरोबरीची
आपल्याच वयाची
आपल्या आईच परमेश्वराने निर्माण केलेल दुसर रुप
म्हणजे बहिण…

रक्ताने नसले तरी प्रेमाने जोडता येणारे  परमपविञ नाते म्हणजे भाऊ बहिण…

भाऊ म्हणजे शक्ती
बहिण म्हणजे भक्ती

भाऊ म्हणजे कर्तव्य
बहिण म्हणजे वात्सल्य

असे हे नाते…
यासाठी एकाच आईपोटी जन्माला यायची गरज नाही.
किंवा ते रक्ताच असाव असही नाही.

रक्ताची नाती कदाचित स्वार्थासाठी तुटतील पण मनाची नाती कायम टिकतात.

ही नाती कशी जोडावी आणि टिकवावी हे शिवचरिञातून शिकता येते.

कल्याणच्या सुभेदाराची देखणी सुन समोर उभी आहे. शिवाजी राजा आहे. राजा काहीही करू शकतो. पण माझ्या राजाचे संस्कार बघा.
अशीच आमची माता आहे सुंदर रूपवती !
पाहून ती लावण्यवती वदले छञपती !!

पर स्त्री ला आई बहिणी सारखे मानून तीची पाठराखण करणारा शिवाजी हा जगातला एकमेव राजा होता.

अशीच एखादी स्त्री मोगल किंवा यवनांच्या ताब्यात सापडली असती तर …..
तर काय झाले असते….
भर दिवसा …
मुलं पतीच्या समोर स्ञिया पळवणारे नराधम कुठे ….
आणि कुठे माझा शिवाजी राजा….

त्या सुनेचा सन्मान करून, मानाने जेव्हा ती तिच्या घरी गेली तेव्हा ती काय बोलली असेल…

तुला त्या काफीराने पळवली..
तुझ्यावर अत्याचार तर झाले नाहीत ना…

या प्रश्नाला तीने उत्तर दिले असेल…

कौन कहता है मुझे भगाया. चुराया. मेरा अपहरण हुवा ! 
नही !.. मै तो मेरे मायके… अपने भाईके पास गयी थी ! मुझे तो फक्र होता है की ये हादसा हुवा इसिलिए मुझे शिवाजी जैसा भाई मिला.!

शिवाजीचे वर्णू गुण किती
न्याय आणि नीती
कल्याण खजिन्याच्या लुटीत एक मान
तरूणी लाभली रूपाची खाण
तिज पुढे नमवूनी मान
परस्ञिचा या केला बहुमान
असा शिवराय चारित्र्यवान……
          ….. शाहीर पिराजीराव सरनाईक

अरे जो माणुस शञूच्या स्ञीशी बहिणीच नात जोडतो तो आपल्या स्ञीयांशी कसे वागत असेल ……

आम्ही त्या शिवाजी राजाच नाव घेतो. आम्ही कस वागल पाहिजे…

हा शिवाजीचा महाराष्ट्र आहे.
तरी का होतात इथ स्ञीवर अत्याचार …

घरात फोटो लावून
घोषणा देऊन
कपाळाला गंध लावून कुणी शिवभक्त होत नाही.

परक्याच्या माता बहिणीला आपली माता बहिण माननारा तो शिवभक्त…..
प्रत्येक स्ञीचा सन्मान करणारा तो शिवभक्त….
घरातील स्ञीला समानतेची वागणूक देणारा तो शिवभक्त…
स्ञीवर अत्याचार करणारे हात कलम करणारा तो शिवभक्त…
आपल्या बहिणी प्रमाणेच दुसरी मुलगी ही कुणाची तरी बहिण आहे ही भावना ठेवणारा तो शिवभक्त…
तीचा पदर पाडणारा नाही तर पदर सावरणारा तो शिवभक्त…

शिवभक्त म्हणून मिरवणारे लाखो आहेत पण चारित्र्यसंपन्न विचारांनी जगणारा तो शिवभक्त…

ती रस्त्याने चालली….
खाली मान घालून …
चार टवाळ पोर…
तीच्यावर कमेंट सुरू…
तिच्या मागे फिरायला लागले …
ञास द्यायला लागले …
तेवढयात एक जन आला…
एकाला कानठाळला…
बाकीचे टवाळ पळून गेले …
ती मुलगी भारावली…
त्याच्या जवळ आली…
भाऊ… इथ किती लोक आहेत..पण या टवाळांना धडा शिकवायला तुम्ही पुढे आलात …

हो ताई.. कारण मि शिवभक्त आहे.
प्रत्येक स्ञी आमच्या देवघरातील देवता आहे. आणि आमच्या देवतेचा अपमान आम्ही करत नाही. आणि सहनही करत नाही. हीच शिकवण आहे आम्हाला शिवाजी राजाची…….
….

शिवराय दक्षिण दिग्विजय करून परतत होते. येताना बेलवडी हे गाव लागते. हे आता कर्नाटकात आहे. या गावात एक देसाईगढी आहे. ही मावळ्यांना जिंकायची होती. मोर्चे लागले …. लढाई सुरू झाली… एक  छोटीशी घडी… मावळे लढतायेत…पण गढी काही मिळेना… एक दिवस गेला …आठ दिवस गेले … पंधरा दिवस….तब्बल एक महिना लागला हि गढी जिंकायला… आणि जिंकली…. कोण होते त्या गढीत… कोण लढल एवढे चिवटपणे….. ती होती साविञी देसाई ….
ही लढवत होती ती गढी….
गढी ताब्यात आली… सावित्री कैद झाली …. राजे गढीत गेले .. गादीवर स्थानापन्न झाले… आणि सावित्रीला समोर आणले गेले … ती घाबरलेली.. गांगरलेली…आता माझ कस होणार …. तिला एक लहान मुल होत . त्याची काळजी लागली. मला शिवाजी मारणार . माझ बाळ अनाथ होणार . आता मी काय करू. राज्यांच्या समोर रडायला लागली …
महाराज मला मारा …
ठार मारा… पण माझ लहान बाळ आहे. माझ्या बाळाला मारू नका. हव तर माझा जीव घ्या .
हे तीचे शब्द ऐकून शिवाजी राजा गहिवरला… तीच्या बाळाला आणायची आज्ञा दिली … बाळ आणले … राजांनी ते छोटे बाळ हातात घेतले. सावित्रीच काळीज धडधडत होते .. आता शिवाजी माझ्या मुलाला मारणार .. काय करावे.
तेवढयात राजांनी आज्ञा दिली. सावित्री ला बंधमुक्त केले. ती धावत राज्यांच्या पायावर झुकली. माझ्या लेकराला मारू नका……..

आणि या शञूच्या बाईसाठी..
शिवाजी राजाच्या मुखातून शब्द बाहेर पडले.
ताई………….
ताई  … कोण म्हटले मी तुम्हाला मारणार … या बाळाला मारणार … मी तुम्हाला ताई म्हटले म्हणजे हे बाळ माझा भाचा झाला. 
आज पहिल्यांदा मी माझ्या भाच्याला भेटतोय… काही तरी दिले पाहिजे ना…
ताई या बाळाच्या दुधभातासाठी मी ही जिंकलेली गढी त्याला देतोय… आणि आजूबाजूचा प्रदेश तुला चोळी बांगडी साठी..
अस म्हणून राजांनी ते बाळ आईच्या हातात दिले. सन्मानाने तीला गादीवर बसवले . तीचा सन्मान केला. काय होतय हे तीला कळत नव्हते .. पण मगाशी दुःखाने येणारे आश्रू आता आनंदाने वहायला लागले.
राजा.. मी तुला शञू समजले..
मी वैरी समजले..
पण तुच भावा बहिणीच नात निर्माण करून या अबलेचा सन्मान केला…
धन्य शिवाजी राजा..
धन्य त्याचे माता पिता..

ही कथा इथच संपत नाही
शिवाजी निघुन गेले. पण शिवरायांचे शिल्प त्या बहिणीने उभारले.
यात गादीवर शिवाजी बसले आहेत..लहान मुल मांडीवर आहे. राज्यांच्या एका हातात दुधाची वाटी आहे आणि दुसऱ्या हातात चमचा आहे. या चमच्याने आपले छञपती बाळाला दुध पाजत आहेत आणि त्या बाळाची आई हे दृश्य मोठ्या कौतुकाने बघत आहे. अस शिल्प चित्र आजही त्या कर्नाटकातील बेलवडी गावात पहायला मिळते.

हेच शिल्प भावा बहिणीच्या प्रेमाची साक्ष देत आहे…

किती महान माझा शिवाजी राजा होता हो..

शिवरायांना सख्खी बहिण नव्हती
पण स्वराज्यातील प्रत्येक परस्ञी शिवाजी राजाला आपला भाऊ मानत होती .
आणि तुम्हाला सांगायची गरज नाही .
एकवेळ स्ञीया मुलाच ऐकत नाहीत …
नवर्याच ऐकत नाहीत ….
पण भावाच मात्र ऐकतात…

हा लेख  लिहिण्याचे कारणही हेच आहे की मला बहिण नाही . पण ही उणिव मला कधी भासली नाही . ज्यांना मी कधी पाहिलं नाही. भेटलो नाही पण अशा माझ्या बहिणी माझ्यावर जीवापाड प्रेम करतात. त्यांना मी त्याच्या भावाप्रमाणे आहे. अशा माझ्या बहिणीसाठी ही शब्दांची भावबीज..

खरच काय नात आहे भावा बहिणीच..
भाऊ ऊनाडक्या करत. खोड्या करत फिरणार. आणि घरी तक्रार आली की बहिण भावाच्या बाजूने उभी राहणार..
दादा जेवल्याशिवाय नाही जेवनार…
भावाचा गृहपाठ ही पुर्ण करणार ..
दादा दादा म्हणून मागेपुढे फिरणार..
दादाची थट्टा करणार ….
पण दुसरे कोणी दादाला बोलल की माञ हिला सहन नाही होणार …
रोज धिंगाणा घालणार ..
काही अडचण आली की दादा मागे दडणार..
लहानपणी भांडण झाले की दादाला बुक्या मारणार …..
आणि बहिणीचा कोमल हात लागत नाही म्हणून दादाही आनंदाने मार खाणार…
बहिणीच्या लग्नासाठी धावपळ करणार …
कर्ज काढणार..
दुप्पट काम करणार ..
माझी ताई सुखात तर मी सुखात या भावनेने जगणार..

आणि ज्या दिवशी हि लाडकी सासरला निघणार तेव्हा माञ याच्या अश्रूचा बांध फुटणार…
दगडाच्या काळजाचा भाऊ लहान मुलासारखा रडणार..
लग्नानंतरही तीच्या ख्याली खुशालीसाठी फोन करणार

काय नात आहे हे भाऊ बहिणीचे…
आणि काय नात आहे शिवाजी राजाच.
माझा शिवाजी भाऊ बहिणीच प्रेम शिकवून गेला .

किती बर होईल हे शिवाजी आपल्याला कळले तर…
वादाच्या पलिकडले शिवाजी …
बहिणीचा भाऊ शिवाजी …

माझ्या भावांनो प्रत्येक शिवभक्ताला हे शिवाजी कळले तर …
कोणत्याही स्ञीवर अत्याचार होणार नाही .
निर्भया सारखी प्रकरणे होणार नाहीत .
कारण प्रत्येक मुलीच्या रक्षणासाठी तीचा शिवभक्त भाऊ उभा असेल .

मध्यरात्री कामावरून सुटणारी तरूणी बिनधास्त असेल
कारण तिला विश्वास असेल
हा शिवबाचा महाराष्ट्र आहे.
शिवभक्तांचा महाराष्ट्र आहे.
माझ्या भावांचा महाराष्ट्र आहे.

Sunday, August 25, 2013

---|| नाते भावा बहिणीचे ||---





बहीण-भावास दरवर्षी प्रतीक्षा असते ती श्रावणमासात येणार्‍या राखी पौर्णिमेची. भावासाठी खास त्याची आवड लक्षात घेऊन बहिणी राखी निवडतात. बहिणीचे लग्न होऊन ती दूर रहात असेल किंवा भाऊ शिक्षण किंवा नोकरी निमित्ताने घरापासून दूर असेल तर राखी वेळेवर पोहचायला हवी यासाठी तिची धडपड सुरू असते. भावाचेही तसेच. आपल्या लाडक्या बहिणीसाठी यावर्षी काय भेट घ्यायची याच्या विचारात तो सतत असतो. त्यासाठी दुकाने पालथी घालातो.
सर्व आटापिटा झाल्यावर मग तो भाग्याचा दिवस उजाडतो. सकाळीच उठून झरझर सर्व कामे आटोपली जातात. बहिण सडा, रांगोळी घालते. आई गोड-धोड करते. संपूर्ण वातावरण प्रसन्नता व उत्साहाने भारलेले असते.
श्रावणातल्या निर्सगाच्या किमयेने नटलेल्या, सृष्टीचे चैतन्य ओसंडून वाहणार्‍या महिन्यात बहीण-भावांचा हा पवित्र सण येतो. या दोघांच्या नात्यातील गहिवर या दिवशी खऱ्या अर्थाने व्यक्त होतो. वास्तविक लहानाचे मोठे होईपर्यंत भांडण, खोड्या, खेळणं, बागडणं, शाळा, अभ्यास सर्व एकत्रच होत होते. हे सगळे शब्दातीत असते.
या दिवशी मात्र हे व्यक्त केले जाते. मात्र तेही आगळ्या पद्धतीने. सकाळी सकाळी चंदनाच्या साबणाने आंघोळ करून भावाला रांगोळी घातलेल्या पाटावर बसवले जाते. बहिण त्याला ओवाळते. आपल्या हाताने रेशमी सुताचा धागा असलेली राखी त्याला बांधते. या मांगल्याच्या क्षणी मनात उत्पन्न होणारे भाव फक्त बहिण- भाऊच जाणू शकतात. भाऊ आपण आणलेली भेट बहिणीस देतो.
बहिण-भावाचे नातेच तसे आहे विश्वास, आदर, त्यागाच्या पायावर उभे असलेले. बहिण ओवाळते त्यावेळी दोघांमध्येही मूक संवाद सुरू असतो. बहिण म्हणत असते, माझ्या भावा मी तुझ्यावर किती माया करते. बहीण भावास यश़, कीर्ती चिंतित असते. माझा भाऊ कर्तृत्ववान व सामर्थ्यवान व्हावा अशीच तिची मनोमन इच्छा असते. तर भाऊ म्हणत असतो, तू काळजी करू नको. अडचण व संकटसमयी धावून येणार तोच खरा भाऊ! तुझा भाऊसुद्धा अशा प्रसंगी नक्की धावून येईल.
बहीण- भाऊ दूर असले तर बहिण फोन करून राखी मिळाली का? म्हणून विचारायला कधीच विसरणार नाही. तोपर्यंत तिला चैन पडत नाही. भाऊही बहिणीच्या राखीची चातकाप्रमाणे वाट बघत असतो. राखी घेऊन येणार्‍या पोस्टमनला तो शतशः: धन्यवाद देत असतो. राखीचा लिफाफा हातात पडल्यावरचा आनंद जग जिंकल्यासारखाच असतो. आणि बहिणीने पाठविलेली राखी रक्षाबंधनाच्या दिवशी मनगटावर मिरवण्यातली ऐट काही औरच असते.
दूर असल्यामुळे प्रत्यक्ष भेट होत नसली तरी बहिणीची राखी व भावाने पाठवलेला राखी मिळाल्याचा संदेश यातूनच त्यांचा संवाद घडत असतो. प्रिय ताईकिंवा छोटी छकुलीतुझी राखी मिळाली.. खूप आनंद झालाएवढ्या ओळी त्यांच्यासाठी पुरेशा असतात.


---|| Vijay--- http://marathiasmita.info   ||---

Sunday, August 11, 2013

---|| बहिण माझी... ||---

मायेची छाया
प्रेमळ काया
सर्वांची लाडकी
बहिण माझी..........



निर्मळ मनाची
सुंदर स्वभावाची
आपुलकीने वागते
बहिण माझी.........



आई-बाबांची काळजी
भावंडांची चिंता
मनी धरून जगते
बहिण माझी.........



सर्वांची लाडकी
आनंदी सावली
माझ्या हृदयी राहिली
बहिण माझी................



       ------अमोल गोवेकर..........

Saturday, March 23, 2013

---|| भावंडे ||---

माझ्या भावंडामुळे मला एकटेपणा कधीच जाणवला नाही, माझ्या लहानपणी प्रत्येकाच्या घरी २/३ मुले असायचीच. त्यामुळे कधी कोणाला एकटेपणा जाणवला असे ऐकिव ही नाही. लहानपणी बहिण-भावंडांच्या मा-यामा-या, एकच वस्तु दोघांना हवी असायची, मग मोठे कोण त्याला सर्वदा त्याग करायला लागायचा, आणी लहान असेल त्याची चैन असायची, पण कधी कधी तु अजुन लहान आहेस, असे सांगुन दादा/ताई भाव खाऊन जायचा/ जायची. कोणताही पदार्थ कितीही आवडत असला तरी आपल्या बहिण / भावांना दिल्याशिवाय आपल्या घशातुन घास उतरत नसे, आई-बाबा आपल्यामुळे आपल्या बहिण / भावाला ओरडले तरी आपल्याला ते आवडत नसे, कधी कधी आई-बाबाचा मार बहिण / भावाला पडत असल्यास आपले ही एका बाजुला मुक रडणे चालु असे. एकाला लागले तर त्याची कळ दुस-याला येणारच इतका ओलावा नात्यात असायचा. मोठ्या भावंडाच्या चांगल्या- वाईट सगळ्यांच गोष्टीची जशीच्या तशी कॊपी करणे चालु असायचे.
हे झाले लहानपणाचे, पण जसे वयात येऊ लागतो तसे ही आपले जवळचे मित्र-मैत्रीण म्हणुन आपली भावंडे सदैव आपल्या बरोबर असतात. भाऊ मोठा आणी बहिण धाकटी असेल तर भावाला आपल्यावर जास्त जबाबदारी आहे याची जाणिव होते. तर कधी बहिणी- बहिणीच्या अनंत गप्पा चालुच असतात, बहिणीची कळ काढण्यात भावाला मज्जा येत असते, बहिण कधी चिडली, कधी रडवेली झाली की मस्त पैकी कॆडबरी नाहीतर आईस्क्रीम घेऊन भाऊ रुसवा काढुन टाकतो, आणि परत तुझी कळ काढणार नाही, मला काय माहित तु एवढी रडवी असशील असे आणि बोलुन घेतो.
पण जेव्हा लग्न हो ऊन बहीण सासरी जाताना तर बहिणी आणि भावाच्या दोघांच्या ही डॊळ्यातील पाणी थांबतच नाही. कधी बहिण माहेर पणाला आली की तीच्यासाठी काय करू आणि काय नको असे भावाला होते, घरात फक्त बहिण म्हणेल तेच होणार असते, बहिण ही भावाच्या पसंती्चे पदार्थ करून, आवडती भेट देऊन आपले प्रेम त्यातुन व्यक्त करत असते. बहिणी- बहिणी असल्यातरी एकमेकींच्या साठी जोरदार खरेदी होते, एकमेकांची मने जपली जातात, रात्र रात्र भर मस्त पैकी गप्पांची मैफिल रंगल्यावर लहाणपणीच्या खोड्या, भांडणे, फजिती, अशा अनेक गोष्टी एकमेकांच्या उकरून काढल्या जातात.
अशी ही भावंडाच्या प्रेमाची शिदोरी लहाणपणा पासुन बरोबर घेऊन आपण फिरत असतो, हे जेव्हा कोणाला भावंडासाठी हट्ट करताना पाहतो तेव्हा आपल्याजवळची प्रेमाने भरलेली शिदोरी अजुन मोठी वाटु लागते.
मी लहान असताना रविवारी मोगली ही सिरिअल लागायची त्यावेळी मला ती सिरिअल खुप आवडायची. आमची परिक्षा चालु होती, आणी माझ्या पपांनी मला हे वाचुन ठेव मी नंतर येईन आणि तुझा अभ्यास घेईन असे सांगुन गेले होते, मी पुस्तक जवळ घेऊन, टीव्ही लावुन मोगली पहात बसले होते, भाऊ दोन /तीन वेळा तरी सांगुन गेला होता की अभ्यास कर, पपा येतील, पण मी काही ऐकत नव्हते, आई ही सांगुन दमली, आणि इतक्यात पपा आले, आणि त्यांनी काही न बोलता टीव्ही बंद केला, तसा मला खुप राग आला मी ते पुस्तक दुर फेकुन दिले आणि मी अभ्यास करणार नाही असे सांगितले, ते पुस्तक फेकल्यामुळे माझ्या पपांना खुप राग आला त्यांनी मला ५ आकडे मोजे पर्यत पुस्तक उचल असे सांगितले, तरी मी जागची हलायला तयार नव्हते, भाऊ जवळच उभा होता, तो पपांना सांगु लागला मी पुस्तक उचलतो तुम्ही तिला रागवु नका, पण त्याला पपांनी तु पुस्तक उचलायचे नाही तिनेच ते उचलले पाहिजे असे सांगितले, तरी मी गाल फुगवुन तशीच उभी होते, मग पपांनी हातात पट्टी घेतली तरी मी पुस्तक उचलायला तयार नव्हते, आणि पपा जसे जवळ आले तसा भाऊ माझ्या माझ्या पुढे येऊन उभा राहिला आणि तीला मारू नका असे पपांना सांगुन रडु लागला, आणि तो रडु लागला म्हणुन मी ही रडु लागले.

---|| ||---

संदर्भ: http://www.misalpav.com/node/5307

---|| माझी लाडकी ….||---

नाते तुझे माझे नव्हते नवे
नाते तुझे माझे हे नव्हते ही जुने
क्षणातच मला दा म्हणालीस …
व मला माझी लाडकी बहीण मिळाली…..
तुला न पाहता केली मी माझी..
खूप गोड आहे ग ही जादू प्रेमाची
मनात गवसतात हिच्या अनेक सूर
आहेस माझ्या काळजात का आहेस इतकी दूर

शब्दात आहे तुझ्या एक जादू
जी लावते वेड त्या प्रत्येक शब्दाचे…
कविता लिहीतेस तू जेव्हा……
गवसतात जणू तुझ्या अतंर्मनातील सूर

जेव्हा तू गालात हसतेस खूप गोड दिसतेस
न पाहिले कधी तूला मी..पण नकळतच मनात वसतेस
आज कळ्ले तुझ्यासारखी मैत्रीण कोणच नाही…अ.. माझी बहीण…
मनच काय माझे ह्र्दयही सांगते आहेस तू माझी लाडकी


संदर्भ : http://powerofmydreams.wordpress.com/2008/07/02/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A5%80/

Monday, February 18, 2013

---|| प्रिय बहिणीसाठी.......||---

वेळ नसतो मला पण अशीही एक वेळ येते,
असतो जेव्हा रिकामा तेव्हा तुजी आठवण येते.

वाटत अस तेव्हा २० वर्ष निव्वल फुकट गेली,
आपण कधी धड बोललोच नाही हीच मोठी चुक  केली .

बघना "दी" तुझ्यामुळॆ मला एक  close frnd मिळाली ,
थोड़ी फार का होईना मुलींची "Way of thinking" कळाली .
.
तूच बाई एवढी माझी बक-बक एकून घेते ,
घोड्या,idiot,
नालायक अशा प्रेमाने शिव्या देते ..
.
Lucky वाटत तेव्हा मला अशी Sweet बहिण मिळाली,
पण दुःख:ही वाटत याच की ही वेळ खुप उशिरा आली..
.
वाटत तेव्हा अस की परत भुतकाळात जाव,
खुप खुप मस्ती करावी तुझ्याशी ,
खुप खुप बोलाव..
.
तेव्हा दूर होती,
आत्ता दूर  आहे,
नंतरही दुरच जाशील,
but always connected रहा ,
वेळातवेळ काढून कधीतरी  contact करत जा .

तू एकमेव व्यक्ति  आहे घरात जीला  माझे  each & every कीड़े  known असतील.
तुला खूप काही सांगितलय  ,
ज्याच्याशी माझे close friends पण unkonw असतील.
.
हजारो friends मिळतील आपल्याला ,
i dont think तुझ्या एवढी कोणी close मला मिळेल ,
झाली जरी close तरी तुझा जागी कधीच नसेल ..



संदर्भ : http://marathikavita.co.in/index.php?topic=3283.0

---|| काय देऊ ग बहिणी बया ||---

बहिणीच्या घरी भाऊ गेला लई दिसा
हाती बेल तांब्या बहीण पुजिती तुळसा
बहिणीच्या घरी भाऊ गेला लई दिसा
सोनियाचा गोफ कमरी करदोडयाचा फासा
बहिणीला भाऊ मोठा दुर्लभ वाटीयला
समया कारण भाऊ आला भेटायला
बहीण भावंड आहेत समस्तला
बहिणीची माया लई माझ्या ग बंधूला
बहिणीच्या घरी भाऊ करतो देऊ देऊ
बहिणीच्या आशीर्वादान माडी कळसाला जाऊ
नको भावा म्हणू बहिणींनी नासल
बहिणीच्या आशिर्वादे धनधान्य ते सायल
बहिणीच्या आशिर्वादे भाऊ झालेत कुबेर
चिरेबंदी वाडे बांधले चहुखोर ||

आंदण देई रे भाऊराया
काय देऊ ग बहिणी बया
वासरासहित पाची गाया
आंदण देई रे भाऊराया
काय देऊ ग बहिणी बया
ऊसा सहित पानमळा
आंदण देई रे भाऊराया
काय देऊ ग बहिणी बया
बहिण परिस लेकीची माया
आंदण देई रे भाऊराया 


संदर्भ : http://www.kavitakosh.org/kk/%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80#.USJBj_Kt-H8

Friday, September 14, 2012

!!! माझी ताई !!!



तू माझी ताई आणि तूच माझी ताई
आई सारखी माया देते वडीलान सारखे प्रेम देते
आजोबान सारखा मुका देते अज्जी सारखा खाऊ देते
कारण तू माझी ताई आणि तूच माझी ताई

भाऊबिजेला खुप Dairymilk आणायचिस मला
छान छान खेल्णी द्यायाचिस मला
रक्षा बन्धन ला शोधून शोधून रखी आणायचिस मला
कारण तू माझी ताई आणि तूच माझी ताई

पिक्चर बघायला पैसे द्यायाचिस तू
रात्रि अपरात्री चोरून घरात घ्यायाचिस तू
माझ्या मैत्रिनिंचे फ़ोन घ्यायाचिस तू
स्वताच्या नावा खाली पचवायाचिस तू
कारण तू माझी ताई आणि तूच माझी ताई

सुख दुखात सम्भालुन घ्यायाचिस तू
माझे पोट भरन्या साठी उपाशी राहिलिस तू
माझ्या साठी आई बाबान चा ओरडा खाल्लास तू
कारण तू माझी ताई आणि तूच माझी ताई

खुप खुप दंगा मस्ती करायचो आपण
आई बाबान बरोबर खुप फिरयाचो आपण
आज्जी अजोबंच्या बरोबर पिझ्झा खायचो आपण
खुप खुप त्रास द्यायाचो आपण
कारण तू माझी ताई आणि तूच माझी ताई

मला खोटे सांगून धोक्याचा इशारा द्यायचिस तू
बाबाना राग आला की मला लपून घ्यायाचिस तू
आई बरोबर जाउंन भाजी आनायाचिस तू
माझ्या आव्डिची भाजी करायाचिस तू
कारण तू माझी ताई आणि तूच माझी ताई

आई सारखी माया देत रहा तू मला
बाबान सारखे प्रेमदेत रहा तू मला
आजोबान सारखा मुका देत रहा तू मला
आज्जी सारखा खाऊ देत रहा तू मला
बस एवढेच सन्गायाचे आहे तुला
कारण तू माझी ताई आणि तूच माझी ताई 

Thursday, September 13, 2012

लाडकी बहिण माझी .... ..!

जरी नसेल ती माझ्या रक्ताच्या नात्याची ..नसेल माझ्या आईच्या कुशीत वाढलेली ..
नसेल माझ्या पाठीवर माझा हात धरून आलेली ..
तरीही आहेच तेवढीच जिवलग अन लाडकी बहिण माझी .....!

ती माझ्या जीवनात आली आणि माझीच झाली
बनली होती माझ्या जिवाभावाची मैत्रीण
आता जुळलं नातं आमचं एक जिवलग भाऊ -बहिण
माझ्या इच्छेसारखीच भेटली मला जिवाभावाची बहिण...!

स्वभाव तिचा खूपच प्रेमळ पण जरासा हळवाच असलेला
खूपच मुडी आणि रागाचा पारा जवळच असलेला
असेलही तुसडी इतरांसाठी आठवत नाही मला माझेवर रागावली कधी ..
कितीही बोललो केली मस्करी पण नाही तिनं परकं मानलंच कधी  ...!

जाईल जेव्हा ती आपल्या हक्काच्या घरी ..
ओठावर हसू मनी आनंद अन नयनी येईल पाणी
राखीच्या सणाला तिला बोलवूया
ओवाळून जवळ घेईल तिला तिचा हा भाऊराया....!

तिची अशीच प्रेम आणि माया माझेवर राहू दे ..
हे देवराया फक्त हि एकच इच्छा माझी पुरी होऊ दे ......!!


सनी..एक वेडा मुलगा .....!


संदर्भ : http://vedasunny.blogspot.in/2011/04/blog-post_16.html

बहिण नको कशी? भावाचे भाव कथन


 जन्माला न आलेल्या बहिणीच्या प्रश्‍नांना उत्तरे देण्यासाठी मी आज माझे मनोगत व्यक्त करतोय. मी त्या जन्माला न आलेल्या बहिणीचा दादा मलाही माझं मन तिच्यापुढे मोकळं करायचं आहे. बहिण म्हणजे वादळात दिव्याभोवती पसरणारे हात संकट काळात खांद्यावर हात ठेवणारी अलगत साथ भावाची भाषा बहिणीला कळते कधी आशा तर कधी निराशा वेगवेगळ्या आपल्या जरी दाही दिशा ताई! अग तुला कोणी सांगितले माझं तुझ्यावर प्रेम नाही म्हणून मला तुझी आठवण येत नाही म्हणून, अग मलाही तुझी खुप आठवण येतेय ग! अग तु नाही म्हणून मी कोणाकडूनही राखी बांधून घेतली नाही. ओवाळून घेतले नाही कारण मला माहित आहे तुझ्या प्रेमाची सर कुणालाही येणार नाही. आई म्हणाली ये बाळा मी राखी बांधते तर मी म्हणालो काही नको तुझ्या हातची राखी. राखी बांधाणार्‍या माझ्या बहिणीच अस्तित्व नष्ट केलेस आणि आता कशाला राखी? राहू दे माझा हात सुना, कळु दे जगाला माझ्या आईबाबांना वंश पुढे चालवायला फक्त मुलगाच हवा होता म्हणून. आणि हो अग मला माहितच नव्हतं ग माझी छोटी माझ्यावर एवढे प्रेम करतेय पण तू चांगलेच झणझणीत अंजन घातलेस माझ्या डोळ्यात, पण तुला अस का वाटत माझ तुझ्यावर प्रेम नाही मला तुझी आठवण होत नाही. अग तुम्हा बायकांना बोलून तरी दाखवता येत पण आम्हा पुरुषांना तेही व्यक्त करता येत नाही, पण आता खूप झाल तुझ्या प्रत्येक प्रश्‍नाच उत्तर देणार आहे मी. मलाही वाटत होतं, मलाही एक गोड बहिण हवीय, मला शेवटपर्यंत साथ देणारी, माझ्याबरोबर भांडणारी, माझ्यावर रुसणारी, माझ्या खोड्या काढणारी, माझ्यावर खोटचं रागवणारी, पण सांगना मी तरी काय करू शकलो, आईबाबांच्या इच्छेपुढे माझं काहीच चाललं नाही गं! आणि ते सगळ कळण्याइतपत माझं वयही नव्हतं ग, तेव्हा माझीही खुप खुप स्वप्न होती गं मलाही तुझ्यावर खुप प्रेम करायचं होतं. तुझ्यासाठी प्रत्येक राखी पौर्णिमेला, भाऊबिजेला नवीन काहीतरी करायचे होते. तुझ्यासाठी नवीन नवीन वस्तु खरेदी करायच्या होत्या, तुला ओवळाणी द्यायची होती. तुझ्या हातची राखी बांधून ऐटीत मिरवयाचे होते, तुझ्यासाठी डोली सजवून भाऊजींची खूप खूप मस्करी करत त्यांचा कान पिळायचा होता आणि तु सासरी जाताना तुझ्या कुशीत शिरून खूप रडायच होते, तुझ्या मुलांचा लाडका मामा होवून त्यांचे खूप लाड करायचे होते, त्यांचं कौतुक करून त्यांचा प्रत्येक हट्ट पुरवायचा होता, पण नियतीला ते खरच मंजूर नव्हतं ग! अग बहिणीची माया, बहिणीच प्रेम काय असतं हे फक्त बहिण असणार्‍यांनाच समजत असं नाही ग उलट ज्यांना बहीण नाही त्यांनाच तिच जास्त महत्त्व असतं. आणि मग डोळ्यात पाणी येवून म्हणावसं वाटतं. बाजार फुलांचा भरला मज बहिण मिळेना एक

आणि हो तू सांगितल्याप्रमाणे उतरलोय बर या युद्धात आता माघार नाही घेणार कारण तु माझी कृष्णाच्या बोटाला साध कापल म्हणून स्वतःचा भरजरी शालू फाडणारी द्रोपदी बहिण आहेस ना! मग मलाही पळवून आणलेल्या यौवन स्त्रीची खणा नाराळांनं ओटी भरून तीची पाठवणी करणारा शिवाजीमहाराजांसारखा भाऊ नको का व्हायला आणि आता आईबाबांना सांगून तरी काय उपयोग आहे म्हणा. कारण वेळ तर कधीच निघून गेलीय ग! पण तुला एवढेच सांगतो की तु एकाच या जन्मी जणू फिरूनी नवी जन्मेन मी असे म्हणून पुन्हा जन्म घे आणि तोही माझ्या पोटी बरं का, मग बघू आई बाबा काय करतायत ते त्यांच्या चुकीची शिक्षा मी भोगतोय, त्यांच्यामुळे किती मोठ्या सुखापासून वंचित राहिलोय आणि आता त्यांनी पश्‍चाताप करूनही काय उपयोग आहे म्हणा. माझ्या मुलीच्या रुपात मी तुला शोधेन, तीच्याकडून ओवाळून राखी बांधून घेईन आणि मग बघ आपल्या जीवनात कसा आनंद पसरेल त्याचबरोबर जगाला ओरडून सांगेन. भराभराटीमध्ये साथ देणार्‍या हजारो नात्यांपेक्षा मिळावी अशी एखादीच बहिण, राहावी तिच्यावर सुखदुःखांची भिस्त, आणि वाढावी दोघांचीही प्रतिष्ठा.

मग ऐकशील ना माझं? घेशील ना पुन्हा जन्म? अग आता तुझा भाऊ खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभा आहे, आणि आता माझ्या मनाला, जगाला, आई बाबांना कळलेय गं! मुलगी म्हणजे वेलीवरती आलेल फुल, स्वार्थापायी झालेली ती एक भूल मुलगी म्हणजे विधात्याला पडलेले एक स्वप्न नवरत्नांच्या हारामधील अनमोल असे रत्न मुलगी म्हणजे भावाला संकटात मदत करणारी प्रसंगी कठोर ही होत शिक्षा देणारी साथ सगळ्यात आधी असतो तिचा मदतीचा हात मुलगी म्हणजे दोन घर जोडणारी अरुंद पायवाट नात्याचा दुसरा अर्थ जणू बहिण भावाची रेशीम गाठ आणि या दुनियेलाही ठणकावून सांगेन का असे स्वतःहून अभागी होताय? का हे पाप करताय? वंश पुढे चालवणार्‍या मुलाच्याही मनात कधी डोकावून पहा त्याला काय हवयं, मिळू द्या त्याला त्याच्या बहिणीची माया, तीही त्याची गरजच आहे ना? मग का असे वागताय? का त्यांना एकमेकांपासून दुर करताय? आणि समस्त स्त्री वर्गाला विचारतोय की स्वतः एक स्त्री असून स्त्रीच्याच जिवावर उठता, अहो प्रत्येकाला मुलगाच हवा आहे, त्या मुलांना बायका कशा मिळणार त्यांचा वंश पुढे कसा चालणार आहे का, उत्तरे या प्रश्‍नांची नाही ना मग सावरा आता तरी अजूनही वेळ गेलेली नाही.

सोडून द्या त्या जुन्या रुढी, देशाची खरी प्रगती करायची असेल तर मुलींना जन्माला येवू द्या, कारण खरतंर त्याच उज्ज्वल भवितव्य घडवू शकतात, शांत संयमी परोपकारी कुठल्याही वादळवार्‍यात निश्‍चतपणे उभ राहण्याची प्रवत्ती त्यामुळातच त्या जन्माला येतानाच घेवून येत असतात, मग का त्यांना असे उखाडून टाकताय? का त्यांची गर्भातच हत्या करताय? तिलाही जन्माला यायचा अधिकार आहे, उघडा डोळे आता तरी, द्या तिला मुलाच्या बरोबरीचे स्थान, मग बघा तुमच्या जीवनात किती आनंद येईल, तीही तुमचं नाव नक्कीच उज्ज्वल करेन कदाचित माझा हा लेख वाचून तुम्हाला तुमच्या चुकांची जाणीव नक्कीच होणार आहे, मग नका तिचा अंत पाहू घेवू द्या तिला मोकळा श्‍वास, दुनियेच्या चालीन चालण्यापेक्षा कधी तरी जगावेेगळा निर्णय घेवून पहा, याचा नक्कीच तुम्हाला कधी पश्‍चाताप होणार नाही. जीवाशी जडता जीव, मनाशी मनाचा भाव सुखाचा गवसे गाव, बहिण तयाचे नाव ताई अंग मी माझी मानसिकता बदललीय ग आता, खरोखर निर्धारपणे, खराखूरा आता मी ठामपणे तुझ्या पाठीशी उभा राहिन तु काळजी नको करूस, मला जमतील तेवढे प्रयत्न मी नक्कीच करीन आणि वचन देतो तुला की याबाबतीत कितीही विरोध झाला तरी माझा, निर्णय मी बदलणार नाही कारण जगण्याच, संकटाशी झुंजण्याचं बळ मला तु दिले आहेस, माझी शक्ती तु आहेस, माझी प्रेरणा तु आहेस, मला पडल्यावर उठवणारी तु आहेस, म्हणून तुझा दादा या नात्याने तुला सांगतोय, क्षणा क्षणाला तुझी स्मृती गं कुठुनही कशी दिसावी सुन्या सुन्या घरात माझ्या गं जन्माला तु पुन्हा यावीस मग घेशील ना पुन्हा जन्म, ऐकशिल ना माझं एवढं, मी वाट पाहातोय तुझ्या आगमनाची होवू माझी सगळी स्वप्न पुर्ण नाही होवू देणार भ्रुण हत्या, थांबणार हे सगळं आता मग ये लवकर बहिणीने लावावा जीव भरून काढावी उणीव असावी आखीव रेखीव चौकट आपुल्या नात्याची विरहात होतो भास ओढ सतावी जीवाला ज्याला नाही बहिण सल समजे त्याला.

राजगुरुनगर
कल्पना आर. शिंदे


संदर्भ: http://www.janhindola.com/News.aspx?nws=thk&id=000000029

!! ती माझी प्रेमळ बहिण !!

जीवनाच्या एका सुंदर 
वाटेवर 
वळणदार वळणावर 
एक एक पाऊल पुढे टाकत असताना 
त्या सुंदर , कोमल अन प्रेमळ 
मनाशी त्या व्यक्तीची माझी 
भेट झाली

जणू ईश्वराने त्याची सारी 
शक्ती, सार वैभव, सार प्रेम 
माझ्याकडे अलगद सुपूर्त केल 
जीवनभरासाठी 

किती सुंदर, गोड अन बोलका
स्वभाव, प्रेमळ ते शब्द,
प्रेमळ ती हवी हवीशी वाटणारी
तिची साद,
तिचा तो हसरा चेहरा
वेदना चिंतांना क्षणातच दूर
करत
चेहर्यावरच प्रसन्नपणा,
टवटवीतपणा पुन्हा बहरून आणत

लहानपणी माझ ते कोवलं 
मन आईकडे 
हट्टच धरायचं 
सख्खी अशी बहिण नाही म्हणून 
मुसु मुसु रडायचो 
मग ती हि म्हणायची 
समजूत काढायची 
एक अशी बहिण तुझ्यासाठी 
हॉस्पिटल मधून नक्कीच 
आपण आणायची 
मग मी हि त्या बोलण्याने 
आनंदून जायचो
खेळत बागडतच मग तसाच 
पळत सुटायचो 

आत्ता उरल्या त्या फक्त 
आठवणी आणि फक्त आठवणीच 
बहिणीच प्रेम काही मिळालच न्हवत 
आता आईच प्रेम हि हरवून गेल 

असा एकाकी पणा वाटत असताना 
आपलस कुणीतरी असल्यासारखं 
भर भरून प्रेम करणार,प्रेमळ नावाने 
संबोधनार...काळजी करणार त्या 
व्यक्तीच म्हणजेच मानलेल्या 
त्या बहिणीच माझ्या जीवनात 
आगमन झाल.


त्या प्रेमळ बहिणीला रक्षा बंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्या
तिच्या सर्व इच्छा - आकांशा पूर्ण होवोत ..सुख समृद्धीने तीच जीवन भरभरून जावोत.
नेहमी हसत खेळत आनंदित रहा.......!

Wednesday, April 6, 2011

---|| वाट तुझी पाहुं किती भाऊराया ||---

दसर्‍यापासून , दिवाळी विसां दिशीं
मज माघारा कधीं नेशी  भाईराया     |      

माझ्या दारावरनं            रंगीत गाडया गेल्या
भावांनीं बहिणी नेल्या            दिवाळीला          ||

भाऊबीजेच्या रे दिवशीं        लोकांचे भाऊ येती
वाट तुझी पाहुं किती            भाऊराया          |   


मुलें पुसतातीं               केव्हां मामा ग येईल
काय उत्तर देईल                बहीण तुझी         

  
मुले पुसताती              येईना का ग मामा
गुंतला काही कामा            माय बोले              

कोणत्या कामांत            भाईराया गुंतलासी
बहिणीची कासाविशी            होत आहे            

शेजी मला पुसे            येऊन घडीघडी            
कधीं माहेराची गाडी            येणारसे              

पूर ओसरले              नदीनाले शांत झाले
अजुन कां न भाई आले            बहिणीसाठी      

नवरात्र गेलें               दसरा दूर गेला
नेण्याला का न आला            भाईराया            

असेल आजारी            काय माझा भाऊ
आयुष्या त्याला देऊ            देवराया      ||


                                                 ---|| साने गुरुजी ||---

संदर्भ : http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=228&Itemid=407&limitstart=12

Monday, March 14, 2011

---|| ताई तुझ्यासाठी - ५ ||---

ताई ...........
मी जेंव्हा लहान होतो
खिडकीतून बघत होतो
त्या शाळेमध्ये
एक शिबीर भरले होते
अध्यात्माचे ......
डोळे मिटून
पद्मासनात बसून
ध्यानमुद्रा करून ते
ओंकार म्हणत होते
शेवटून गुरुजींनी
सद्भावना वितरण केले
म्हणजे.........
तुमच भल हो
तुम्ही सुखी हो
तुमच्या समस्या दूर हो
अशा भावना व्यक्त केल्या
त्यातली एक भावना
मी तुझ्यासाठी राखून ठेवली
वाटले...........
तू येशील तेंव्हा
ती भावना तुला देईन
पण तू नाही आलीस
पण गुरुजी म्हणाले होते 
कि सद्भावना दुरून पण देता येतात 
त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने 
डोळे मिटून 
पद्मासनात बसून 
तीन वेळा ओंकार म्हणून  
देवाला प्रार्थना केली
माझी ताई जिथे असेल
तिला सुखी ठेव
तिला छान छान खाऊ दे
तिचे सगळे हट्ट पूर्ण कर
तिला तिच्या भावाची
लवकर भेट करून दे
ताई, तू लवकर ये
ताई, तू लवकर ये
ताई, तू लवकर ये
               ---|| लेखक माहित नाहीत||---