---|| राजे ||---

Wednesday, April 6, 2011

---|| वाट तुझी पाहुं किती भाऊराया ||---

दसर्‍यापासून , दिवाळी विसां दिशीं
मज माघारा कधीं नेशी  भाईराया     |      

माझ्या दारावरनं            रंगीत गाडया गेल्या
भावांनीं बहिणी नेल्या            दिवाळीला          ||

भाऊबीजेच्या रे दिवशीं        लोकांचे भाऊ येती
वाट तुझी पाहुं किती            भाऊराया          |   


मुलें पुसतातीं               केव्हां मामा ग येईल
काय उत्तर देईल                बहीण तुझी         

  
मुले पुसताती              येईना का ग मामा
गुंतला काही कामा            माय बोले              

कोणत्या कामांत            भाईराया गुंतलासी
बहिणीची कासाविशी            होत आहे            

शेजी मला पुसे            येऊन घडीघडी            
कधीं माहेराची गाडी            येणारसे              

पूर ओसरले              नदीनाले शांत झाले
अजुन कां न भाई आले            बहिणीसाठी      

नवरात्र गेलें               दसरा दूर गेला
नेण्याला का न आला            भाईराया            

असेल आजारी            काय माझा भाऊ
आयुष्या त्याला देऊ            देवराया      ||


                                                 ---|| साने गुरुजी ||---

संदर्भ : http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=228&Itemid=407&limitstart=12

Monday, March 14, 2011

---|| ताई तुझ्यासाठी - ५ ||---

ताई ...........
मी जेंव्हा लहान होतो
खिडकीतून बघत होतो
त्या शाळेमध्ये
एक शिबीर भरले होते
अध्यात्माचे ......
डोळे मिटून
पद्मासनात बसून
ध्यानमुद्रा करून ते
ओंकार म्हणत होते
शेवटून गुरुजींनी
सद्भावना वितरण केले
म्हणजे.........
तुमच भल हो
तुम्ही सुखी हो
तुमच्या समस्या दूर हो
अशा भावना व्यक्त केल्या
त्यातली एक भावना
मी तुझ्यासाठी राखून ठेवली
वाटले...........
तू येशील तेंव्हा
ती भावना तुला देईन
पण तू नाही आलीस
पण गुरुजी म्हणाले होते 
कि सद्भावना दुरून पण देता येतात 
त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने 
डोळे मिटून 
पद्मासनात बसून 
तीन वेळा ओंकार म्हणून  
देवाला प्रार्थना केली
माझी ताई जिथे असेल
तिला सुखी ठेव
तिला छान छान खाऊ दे
तिचे सगळे हट्ट पूर्ण कर
तिला तिच्या भावाची
लवकर भेट करून दे
ताई, तू लवकर ये
ताई, तू लवकर ये
ताई, तू लवकर ये
               ---|| लेखक माहित नाहीत||---

Monday, March 7, 2011

---|| कस हे भाऊ बहिणीच नात ||---

 

अस हे भाऊ बहिणीच नात
क्षणात हसणार , क्षणात रडणार
क्षणात मारणार , क्षणात मार खाणार
क्षणात भांडणार , क्षणात रागवणार
पण किती गहर प्रेम आसत हे दोघाच
आस आसत हे बहिण भावाच आतूट नात !! १ !!

ताई पाणी भरते , भाऊ तीला मदत करतो
तेच पाणी तो खेळन्यासाठी वापरू लागला की ताई त्याला ओरडते
पण ओरडन्यामागे तीचे भावावरिल प्रेम लपलेल आसत
आस आसत हे बहिण भावाच आतूट नात !!२ !!

भाऊ मस्ती करतो , ताई त्याला फटका मारते
पण भाऊ लहान घरच्यांचा लाडका , तिला ओरडा पडतो
पण तोच आपल्या तीच सांत्वन करायला पुढे आसतो
आस आसत हे बहिण भावाच आतूट नात !! ३ !!

बहिण सासरहून येते , भावाला खुप आनंद होतो
तो तिच्याशी परत आपल्या बालपनात हारून जातो
पण ती परत सासरला चालली की
तो घरातील एका कोपर्यात रडत बसतो
आस आसत हे बहिण भावाच आतूट नात !! ४ !!
                                                         कवी: आनंद राजगोळे

---|| रक्ताच्या नात्याला तरी तोडू नकोस ||---

सकाळी उठलो तर वाटलं कुणी तरी भेटणार
आपल्या हृदयाचा ठाव कुणी तरी घेणार
योगायोगानेच आपली ओळख झाली
वाटलं मनाला कुणीतरी जवळची भेटली

मैत्रीच्या झाडात आपल्या लागले प्रेमाचे फळ
संकटांच्या क्षणीच नेमके दिले तू मला बळ
मैत्रीच्या नात्याला तू एक नविनच आयाम दिलं
एक अजुन बहिण भेटल्याने मन स्फंदून गेलं

पहिले रोज काही नविन घडत नव्हतं
आता मात्र सांगायलाही वेळ पुरत नव्हतं
काय सांगू काय नाही असं व्हायचं
तू समोर आलीस की सगळ विसरायला व्हायचं

आठवते का ग तुला पहिल्या राखिला तू मला राखी पाठवली नव्हतीस
सख्या भावांच्या गर्दित तू या मानलेल्या भावाला विसरली होतीस
विचारल तर म्हणालीस अरे घरी वेगळ वाटेल
तुझ्या माझ्या नात्याचं सत्य कस कोणी समजेल

तेव्हाच मी ठरवलं आपल्या मनाशी
एक वेळ अशी येईल जेव्हा तू मला धरशील उराशी
आठवेल तुला आपण क्षणोक्षणी किती भांडायचो
उगाचच खिलज्या पाडून पुन्हा मनवायचो

एके दिवशी नको तेच अघटित घडले
तुला तुझ्या रक्ताच्या नात्याचं कुणीतरी भेटले
अनवधानानी तू त्याच्याशी जवळीक करत गेलीस
रक्ताच्या भावापुढे मानलेल्या भावाला विसरून गेलीस

दिवसांमागुन आठवडे महीने निघून गेले
आपले मात्र बोलायाचे तसेच राहून गेले
एकदा भांडणाचा उद्रेक झाला
तुझ्या त्या रक्ताच्या भावाने आपला सम्पर्कच मिटवला

आजही तुझ्या आवाजाची वाट बघतोय
प्रेमाने "दाद्या" म्हणशील म्हणून रोजच मरतोय
एकदा ताई म्हणालो नाही याचा का एवढा बदला घेतलास
माझ्या वाटचा घास तू त्याच्या तोंडी भरवलास

कधीही विसरु नकोस आपल्या या भावाला
धाकटी बहिण असुनही तुला तिचाच दर्जा देणार्याला
कधी तरी माझी आठवण काढशील का ग
मानलेल्या या भावाला आठवशील ना ग

असशील तू दूर सध्या तरी माझ्या मनात राहशील
हाक तर मारून बाघ सदैव मला तुझ्यासाठी उभाच बघशील
मानलेल्या नात्यापेक्षाही श्रेष्ठ असतं का ग रक्ताचं नातं
फुल तरी विसरते का आपल्या झाडाचं पातं

आपल्या प्रेमाला कधी विसरु नको
एव्हढच मागतो की त्या रक्ताच्या नात्याला तरी तोडू नकोस...

                                                                     
                                                                                 कवि : अक्षय

संदर्भ : http://dedhakka.blogspot.com/2010/07/marathi-kavita_26.html

Friday, March 4, 2011

---|| ताई तुझ्यासाठी -4 ||---

ताई....
मी जेंव्हा लहान होतो
त्या शाळेसमोर
माझ्या मित्राचे घर आहे
खिडकीतून मित्र दिसत होता
घरातील कोणी मोठी व्यक्ती
त्याला मारत होते
तो खूप रडत होता
तेव्हड्यात त्याची ताई
स्वयपाक घरातून धावत आली
त्याला घट्ट मिठी मारून
त्यांच्यापासून वाचवून
दुसऱ्या खोलीत घेवून गेली
दार घट्ट लावून
त्याला खूप वेळ समजावत होती
त्याचे खूप लाड करत होती
पाहून मला खूप बर वाटल
सर्व शांत झाल्यावर
मी रात्री हळूच
त्याच्या खिडकीजवळ गेलो
हळू आवाजात त्याच्याशी बोलत
मी त्याच काय चुकल होत
नीट समजावून घेतलं
ती चूक मी राखून ठेवली
वाटले.....
तू येशील तेंव्हा
मी पण तीच चूक करीन
पण तू नाही आलीस 
                      ---|| लेखक माहित नाहीत||---

---|| ताई तुझ्यासाठी -3 ||---

ताई.......
मी जेंव्हा लहान होतो
खिडकीतून बघत होतो
त्या शाळेत एक लग्न होते
दरवाज्यात उभ्या
एक छान मावशी
पाहुण्यांच्या अंगावर
गुलाबजल शिंपडत होत्या
मी पण हळूच गेलो
मावशीनी गुलाबजल
 माझ्यावर शिंपडले
मला छान वाटले
त्यातला एक थेंब
कापसात शोषून
मी तुझ्यासाठी राखून ठेवला
वाटले.....
ईतर मुलींप्रमाणे
तुला पण गुलाबजल आवडत असेल तर ?
पण तू नाही आलीस
म्हणून तो थेंब सुकून गेला
सुगंध पण विरून गेला
पण, तू येशील तेंव्हा
तुला गुलाबजल आवडत असेल तर
मला माहित आहे
त्या मावशी कोठे राहतात 
                           ---|| लेखक माहित नाहीत||---

Friday, February 25, 2011

---|| बहिण ||---

दादा मला पण खेळू दे न तुज बरोबर
बघ मग सांगेन तुझे नाव आई ला
तू जर नाही न ऐकले माझे
येणार नाही मग मी तुझ्याशी बोलायला
रुसते ती आणि तिचा होतो फुग्गा
गोड कशी दिसते मग
कट्ट्या वर धरून बसलेली हातात
केस विन्चर्लेली इवलीशी बावली
घालुन तो गुलाबी झब्बा..
मैत्रिणीच्या आईने दिलेले चोकलेट
पेन्सिल बॉक्स मधे कशी जपून ती ठेविते
अभ्यास करतांना,
उघडते ते हळूच मग घरी
अन म्हणते कशी,
"दादा घेशील का रे हे खाऊन, बघ नाही मला आवडली जरा"
दादा जातो खेळायला,
अन येते मग ही चिमणी
ब्याट, कपडे, बुट, मोजे सगळं सगळं
तिच्या इवल्याश्या हातांनी
आवरते..
दादा च्या खोलीतला पसारा
मार पडताच बाबांकडून दादा ला
टचकन येते डोळ्यात तिचे पाणी
किमया त्या नात्याची कशी गोड
न येईल दादा च्या ते कधी ध्यानी
दादा ला कुठे ठाऊक, ती नाही छोटी 'बावली'
गेली आई दोन दिवस गावा,
आवडती पोळी भाजी हातांनी करून
भरवते मग हीच छोटी 'मावली'
कळण्या च्या आताच कधी होते ती मोठ्ठी
नियमच तोः
तारुण्य लागताच उंबरठ्या वर
झालेली असते
नुसती तिच्या लग्ना ची घाई
दादा ला मग जाणवते अचानक
आपण होते तिच्या बरोबर थोडे खेळायला
हुंद्ते आत अन कंठ असा दाटतो
वेडे मन मग विचारते
होईल का पुन्हा एकदा ती छोटी?
बनेल का पुन्हा ती माझी सावली?
ठरते लग्न जेन्व्हा तिचे,
मन दादा चे मग क्षण क्षण भिजे
एकान्त शोधुन रड्तो तोच दादा
मात्र अश्र्रु न त्याचे कोणास दिसे
येते मग तिच्या निघण्याचि घटिका
अन दाटुन कंठ येतो
अन धरुन घट्ट ती दादाचा हात विचारते
'येशील न रे राखीपौर्णिमेच्या औक्षणाला'
तोवर भावनांची पिशवी मात्र
झाली असते गच्च ओली!!

संदर्भ : http://www.maayboli.com/node/22192

---|| ताई -- मोठी बहिण ||---

आई-वडील या नंतर कोण आपल्याकडे पाहणारी असते...
तीच ती आपली ताई असते...

लहान भावंडासाठी तडजोड करत असते
तीच ती आपली ताई असते...

लहान भावंडांच्या चुका ..आपल्या पोटात घालत असते
तीच ती आपली ताई असते...

लहान भावंडांवर येणाऱ्या प्रत्येक संकटाला
सामोरी जी जात असते
तीच ती आपली ताई असते...

घरी आई-वडील नसताना मायेने सांभाळ करणारी असते
तीच ती आपली ताई असते...

लहान भावंडांचे प्रत्येक हट्ट पुरवणारी असते
तीच ती आपले ताई असते...

चुकीच्या वाटेवरून जात असताना..
आपल्या ध्येया पासून भरकटत असताना..
योग्य मार्ग दाखवणारी जी असते
तीच ती आपले ताई असते...

आई-वडील नंतर आपल्यावर जीव लावणारी असते
तीच ती आपली ताई असते...

स्वतच्या इच्छेला मारून
स्वताच्या जबाबदार्या ओळखून
त्यासाठी रात्र-दिवस कष्ट करणारी जी असते
तीच ती आपली ताई असते...

अशी हि ताई देव प्रत्येक भावंडाना देओ
अशा या प्रेमळ ताईच्या सर्व इच्छा पूर्ण होवो...सर्व सुख मिळो...सदा
आनंदी राहो.....!
 
                                                                                 ---|| शिरीष सप्रे ||---

----|| नाते भावा बहिणीचे ||---

बहीण-भावास दरवर्षी प्रतीक्षा असते ती श्रावणमासात येणार्‍या राखी पौर्णिमेची. भावासाठी खास त्याची आवड लक्षात घेऊन बहिणी राखी निवडतात. बहिणीचे लग्न होऊन ती दूर रहात असेल किंवा भाऊ शिक्षण किंवा नोकरी निमित्ताने घरापासून दूर असेल तर राखी वेळेवर पोहचायला हवी यासाठी तिची धडपड सुरू असते. भावाचेही तसेच. आपल्या लाडक्या बहिणीसाठी यावर्षी काय भेट घ्यायची याच्या विचारात तो सतत असतो. त्यासाठी दुकाने पालथी घालातो.

सर्व आटापिटा झाल्यावर मग तो भाग्याचा दिवस उजाडतो. सकाळीच उठून झरझर सर्व कामे आटोपली जातात. बहिण सडा, रांगोळी घालते. आई गोड-धोड करते. संपूर्ण वातावरण प्रसन्नता व उत्साहाने भारलेले असते.

श्रावणातल्या निर्सगाच्या किमयेने नटलेल्या, सृष्टीचे चैतन्य ओसंडून वाहणार्‍या महिन्यात बहीण-भावांचा हा पवित्र सण येतो. या दोघांच्या नात्यातील गहिवर या दिवशी खऱ्या अर्थाने व्यक्त होतो. वास्तविक लहानाचे मोठे होईपर्यंत भांडण, खोड्या, खेळणं, बागडणं, शाळा, अभ्यास सर्व एकत्रच होत होते. हे सगळे शब्दातीत असते.

या दिवशी मात्र हे व्यक्त केले जाते. मात्र तेही आगळ्या पद्धतीने. सकाळी सकाळी चंदनाच्या साबणाने आंघोळ करून भावाला रांगोळी घातलेल्या पाटावर बसवले जाते. बहिण त्याला ओवाळते. आपल्या हाताने रेशमी सुताचा धागा असलेली राखी त्याला बांधते. या मांगल्याच्या क्षणी मनात उत्पन्न होणारे भाव फक्त बहिण- भाऊच जाणू शकतात. भाऊ आपण आणलेली भेट बहिणीस देतो.

बहिण-भावाचे नातेच तसे आहे विश्वास, आदर, त्यागाच्या पायावर उभे असलेले. बहिण ओवाळते त्यावेळी दोघांमध्येही मूक संवाद सुरू असतो. बहिण म्हणत असते, माझ्या भावा मी तुझ्यावर किती माया करते. बहीण भावास यश़, कीर्ती चिंतित असते. माझा भाऊ कर्तृत्ववान व सामर्थ्यवान व्हावा अशीच तिची मनोमन इच्छा असते. तर भाऊ म्हणत असतो, तू काळजी करू नको. अडचण व संकटसमयी धावून येणार तोच खरा भाऊ! तुझा भाऊसुद्धा अशा प्रसंगी नक्की धावून येईल.

बहीण- भाऊ दूर असले तर बहिण फोन करून राखी मिळाली का? म्हणून विचारायला कधीच विसरणार नाही. तोपर्यंत तिला चैन पडत नाही. भाऊही बहिणीच्या राखीची चातकाप्रमाणे वाट बघत असतो. राखी घेऊन येणार्‍या पोस्टमनला तो शतशः: धन्यवाद देत असतो. राखीचा लिफाफा हातात पडल्यावरचा आनंद जग जिंकल्यासारखाच असतो. आणि बहिणीने पाठविलेली राखी रक्षाबंधनाच्या दिवशी मनगटावर मिरवण्यातली ऐट काही औरच असते.

दूर असल्यामुळे प्रत्यक्ष भेट होत नसली तरी बहिणीची राखी व भावाने पाठवलेला राखी मिळाल्याचा संदेश यातूनच त्यांचा संवाद घडत असतो. प्रिय ताई... किंवा छोटी छकुली... तुझी राखी मिळाली.. खूप आनंद झाला... एवढ्या ओळी त्यांच्यासाठी पुरेशा असतात.

 संदर्भ : http://marathi.webdunia.com/religion/festivals/rakhi/0808/14/1080814004_1.htm

---|| बहिण भावाच्या नात्याचे अतूट बंधन ||---

रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या प्रेमाचे बंधन! या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे ह्दय प्रेमाने जिंकून घेते. हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस किंवा संयमाचा संयोग होय.जगातील सर्व नात्यांमध्ये भाऊ-बहिणीचे प्रेम निस्वार्थी आणि पवित्र असते. भारतीय संस्कृतीतील पूर्वजांनी या नात्यातील निस्पृहता आणि पवित्रतेचा महिमा गायला आहे. भारतीय संस्कृती मानव जीवनाच्या महानतेचे दर्शन घडविणारी संस्कृती आहे. स्त्रीला भोगवस्तू न समजता तिची पूजा करणारी संस्कृती आहे.

स्त्री समानतेची पोकळ भाषा बोलणार्‍या सुधारकांना किंवा पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करणार्‍यांना नम्रतापूर्वक सांगितले पाहिजे, की भारतीय संस्कृतीने स्त्रीची पूजा केली आहे. 'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:' जिथे स्त्रियांची पूजा, तिचा सम्मान केला जातो तिथे देवांचा वास असतो असे मनूने म्हटले आहे. स्त्रीकडे भोगाच्या दृष्टीकोनाऐवजी पवित्र दृष्टीने, आईच्या भावनेतून पाहण्याचा संदेश देणारी भारतीय संस्कृती आहे.

रक्षाबंधनाचा सण म्हणजे दृष्टी परिवर्तनाचा सण! बहिणीने हातावर राखी बांधताच भावाची दृष्टी बदलते. राखी बांधणार्‍या बहिणीकडे तो विकृत नजरेने पाहत नाही. समाजात आपली बहिण ताठ मानेने वागावी म्हणून तिच्या संरक्षणाची जबाबदारी स्वतःकडे घेतो. मात्र आज तिची मस्करी करणार्‍या आणि जनावरांप्रमाणे वागणूक देणार्‍या भावांना समजावून सांगण्याची गरज आहे.

बहिण भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याच्या कपाळावर टिळा लावते. हे केवळ भावाच्या कपाळाची पूजा करण्यासाठी नव्हे तर त्याचे विचार आणि बुद्धीवरील विश्वासाचे दर्शन आहे. भावाच्या कपाळावर टिळा लावताना सामान्य वाटणार्‍या या क्रियेत दृष्टी परिवर्तनाच्या महान प्रक्रियेचा समावेश आहे. सामान्य दृष्टीने जगाकडे पाहणार्‍या नजरेशिवाय भावनात्मक दृष्टीने जगाकडे पाहण्यासाठी एक पवित्र तिसरा डोळा बहिणी आपल्या भावाला देऊन त्रिलोचन बनविते, असा संकेत या क्रियेमध्ये दिसून येतो.

संदर्भ : http://marathi.webdunia.com/religion/festivals/rakhi/0808/14/1080814014_1.htm

---|| ताई तुझ्यासाठी - 2 ||---

ताई ........
मी जेंव्हा लहान होतो
खिडकीतून बघत होतो
त्या शाळेमध्ये
एक शिबीर भरले होते
विणकामाचे
छान छान बाहुल्या
ससा मांजर अस्वल
त्या मुलींने बनवले
मला पण आवडले
ते सगळे गेल्यावर
मी हळूच तिकडे गेलो
लांब माझ्या हाताएवढा
एक सुंदर रेशमी धागा
तिथे राहून गेला होता
तो धागा पटकन उचलून
मी तुझ्यासाठी राखून ठेवला
वाटले ....
इतर मुलींप्रमाणे
तुला पण विणकामाची आवड असेल तर?
पण तू नाही आलीस
म्हणून तो धागा उसवून गेला. 
                                                              ---|| लेखक माहित नाहीत||---

---|| ताई तुझ्यासाठी -1 ||---

 माझ्या वाचनात आलेली कविता
ताई.....
मी जेंव्हा लहान होतो
खिडकीतून बघत होतो
त्या शाळेसमोर
काही मुले, झाडावरचे
बोर तोडून खात होते
भरपूर आनंद घेत होते
ते सगळे गेल्यावर
मी हळूच तिकडे गेलो
दोन तीन बोर मी
खाली पडलेली पाहत होतो
त्यातले एक बोर उचलून
मी तुझ्यासाठी राखून ठेवले
वाटले ......
तुला पण आवडत असतील
पण तू नाही आलीस
म्हणून ते बोर सुकून गेल
पण, तू येशील तेंव्हा
मी ते बोर
पाण्यात भिजवून
तुला खावू घालीन .. 
                                  ---|| लेखक माहित नाहीत||---

---|| प्रेम ||---

प्रेम आईवर कराव,
आईच्या ममतेवर कराव.
प्रेम वडिलांवर कराव,
वडिलांच्या कठोरतेवर कराव.
प्रेम आजी आजोबांवर कराव,
त्यांच्या संस्कारावर कराव.
प्रेम बहिणीवर कराव,
बहिणीच्या मायेवर कराव.
प्रेम भावावर कराव,
भावांच्या आधारावर कराव.
प्रेम प्रियसीवर कराव,
प्रियसीच्या लाजण्यावर कराव.
प्रेम मित्रांवर कराव,
मित्रांच्या सहवासावर कराव,
प्रेम शिवरायांवर कराव,
शंभू राजांसारख घडावं. 
                                  ---|| विठ्ठलराजे||---

---|| फोटोत फक्त हसते, किती गोड माझी ताई! ||--

  काहीजणांना बहिनाचा सहवास लहानपणापासूनच नसतो तर काही जणांची ताई कोणत्याना कोणत्या अपघातातून दुरावते, अश्याच एका ताई च्या आठवणीतील कविता ..........


नाही कधीच बसले,
ते पाठीवरी धपाटे,
जाण्या कुशीत रडण्या,
नशीब झुरले आहे.

खेळातले भांडणे वा
लाडातले गालगुच्चे,
ताईकडे झोपण्याला
नशीब चुकले आहे.

ताऊचा घास पहिला
भरविता म्हणे आई,
"सोन्या, तुझ्या पाचवीला
नशीब पुजले आहे."

फोटोत फक्त हसते
किती गोड माझी ताई!
घेण्यास बघ मुका तो
नशीब मुकले आहे.

आज भाऊबीज मोठी,
सरते पुन्हा दिवाळी,
ओवाळण्यास मजला
नशीब उरले आहे.

रेषा कुठली चुकीची
कळण्यास वाव नाही,
भरल्या हातावरूनी
नशीब उठले आहे. 
                         ---|| लेखक माहित नाहीत||---

---|| एक बहिण असावी...||---

लहानपणी वाटे
एक बहिण असावी...
एक गोळी तीला चिमणीच्या दाताने तोडून द्यावी.
उरलेली अर्धीही तीलाच नंतर द्यावी.
एक बहिण असावी...
पाठीशी तीला घालताना आईची बोलणी खावी.
नंतर मात्र तीलाच एक ठेउन द्यावी.
एक बहिण असावी...
चीडवायला तीला फार मजा यावी.
पण रडू ती लागताच जिवाची घालमेल व्हावी.
एक बहिण असावी...
पहिल्या माझ्या पगारात तीला छान गिफ्ट आणावी.
आणि गिफ्ट हातात पडताच तिने वर पार्टीही उकळावी.
एक बहिण असावी...
असेच आणि बरेच नेहेमी मला वाटे.
एक बहिण असावी...
पण?
मला बहिण का नसावी?
त्यामुळे राखी पोर्णिमा माझी सूनी सुनी जावी....
आणि अचानक...
आयुष्यात माझ्या एक छोटुकलि यावी.
सख्खी नसेल तरिहि सख्ख्याहून सख्खी वाटावी.
एक बहिण यावी...
तीच्याशी बोलताना माझी सुख दुख्खे सांगावी...
सांगता सांगता तीचीही जाणून घ्यावी...
खरच घर मुलीशिवाय अपूर्ण असत . 
                                  ---|| लेखक माहित नाहीत||---

---|| ताई तू फूल गडे ||---

"ताई तू फूल गडे माझे, ताई तू नक्षत्रचि माझे,
ताई तू रत्न गडे माझे
ताई तू पाखरू गे माझे !
या सर्वाहून गोड गोड गे शील रूप तुझे
यांची उपमा नच साजे !
फूल हे हसते, तु हसशी
परी तव अर्थ किती हास्यी !
काय फुलाच्या मला पाकळ्या दावितील मौजे
जसे हे ओठ गडे तुझे?" 
                      ---|| विपूल जगताप ||---

Thursday, February 24, 2011

---|| ताई, तुझ प्रेम.... ||---

नात हे प्रेमाच...
नितळ अन निखळ....
मी सदैव जपलय.....

हरवलेले ते गोड दिवस...
त्यांच्या मधुर त्या आठवणी....
आज सार सार आठवलय....

हातातल्या राखिसोबतच,
ताई, तुझ प्रेम मनी मी साठवलय .... 


संदर्भ :  http://amardhembare.com/Poems/Marathi_Poem_tai_Tuz_Prem.aspx

---|| बहिणीच्या प्रेमाला पोरकाच राहिलो ||---

खुप दिले देवाने मला ,
आई - वडिलांची माया दिली ,
भावांचा आधार दिला.
मात्र बहिणीच्या प्रेमाला पोरकाच राहिलो.
आयुष्यात कोणत्याही दुखद प्रसंगी
 डोळ्यातून अश्रु येवू दिले नाहीत ,
पण रक्षाबंधना दिवशी अश्रुना थांबवू शकत नाही .
कितीतरी आनंदाचे क्षण मी हरवून बसलो .
लहान पनी बहिनिबरोबर भांडान करण,
ती रडू लागताच,
 तिला मिठीत घेवून तिची माफी मागन ,
आपण शाळेत कसेबसे पास होणारे ,
पण बहिणीचा शाळेत आलेला नंबर
अभिमानान सर्वाना सांगन,
बहिणीला सासरी पाठवताना,
शेवटपर्यंत तिच्या पाठमोर्या आक्रुतिकडे पाहन,
तिच्या सोबत घालवलेले क्षण आठवन
खरच कुटुंब मुलिशिवाय अपूर्ण असत.
                                             ---|| विठ्ठलराजे||---