---|| राजे ||---

Monday, February 18, 2013

---|| काय देऊ ग बहिणी बया ||---

बहिणीच्या घरी भाऊ गेला लई दिसा
हाती बेल तांब्या बहीण पुजिती तुळसा
बहिणीच्या घरी भाऊ गेला लई दिसा
सोनियाचा गोफ कमरी करदोडयाचा फासा
बहिणीला भाऊ मोठा दुर्लभ वाटीयला
समया कारण भाऊ आला भेटायला
बहीण भावंड आहेत समस्तला
बहिणीची माया लई माझ्या ग बंधूला
बहिणीच्या घरी भाऊ करतो देऊ देऊ
बहिणीच्या आशीर्वादान माडी कळसाला जाऊ
नको भावा म्हणू बहिणींनी नासल
बहिणीच्या आशिर्वादे धनधान्य ते सायल
बहिणीच्या आशिर्वादे भाऊ झालेत कुबेर
चिरेबंदी वाडे बांधले चहुखोर ||

आंदण देई रे भाऊराया
काय देऊ ग बहिणी बया
वासरासहित पाची गाया
आंदण देई रे भाऊराया
काय देऊ ग बहिणी बया
ऊसा सहित पानमळा
आंदण देई रे भाऊराया
काय देऊ ग बहिणी बया
बहिण परिस लेकीची माया
आंदण देई रे भाऊराया 


संदर्भ : http://www.kavitakosh.org/kk/%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80#.USJBj_Kt-H8

No comments:

Post a Comment