---|| राजे ||---

Friday, February 25, 2011

---|| फोटोत फक्त हसते, किती गोड माझी ताई! ||--

  काहीजणांना बहिनाचा सहवास लहानपणापासूनच नसतो तर काही जणांची ताई कोणत्याना कोणत्या अपघातातून दुरावते, अश्याच एका ताई च्या आठवणीतील कविता ..........


नाही कधीच बसले,
ते पाठीवरी धपाटे,
जाण्या कुशीत रडण्या,
नशीब झुरले आहे.

खेळातले भांडणे वा
लाडातले गालगुच्चे,
ताईकडे झोपण्याला
नशीब चुकले आहे.

ताऊचा घास पहिला
भरविता म्हणे आई,
"सोन्या, तुझ्या पाचवीला
नशीब पुजले आहे."

फोटोत फक्त हसते
किती गोड माझी ताई!
घेण्यास बघ मुका तो
नशीब मुकले आहे.

आज भाऊबीज मोठी,
सरते पुन्हा दिवाळी,
ओवाळण्यास मजला
नशीब उरले आहे.

रेषा कुठली चुकीची
कळण्यास वाव नाही,
भरल्या हातावरूनी
नशीब उठले आहे. 
                         ---|| लेखक माहित नाहीत||---

No comments:

Post a Comment